kidzania mumbai : KidZania मध्ये जा आणि करा खूप धम्माल; येथे मिळेल संपूर्ण गाईड!

65
kidzania mumbai : KidZania मध्ये जा आणि करा खूप धम्माल; येथे मिळेल संपूर्ण गाईड!

कुटुंब आणि मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणे आहेत. यापैकी एक गमतीदार ठिकाण म्हणजे KidZania… हे १६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जागतिक इनडोअर मनोरंजन, गेम्स आणि शैक्षणिक केंद्र आहे. मुलांना सक्षम करणे, प्रेरणा देणे आणि शिक्षित करणे हा यामागचा मूळ उद्देश आहे. (kidzania mumbai)

KidZania चा पत्ता :

KidZania, आर सिटी मॉल, ३ रा मजला, नॉर्थ विंग, एलबीएस मार्ग, घाटकोपर पश्चिम, मुंबई-४०००८६. महाराष्ट्र.

KidZania ची वेळ :

मंगळवार ते रविवार : सकाळी १०.०० ते रात्री १०.०० वा

सोमवारी बंद

KidZania एक विलक्षण इनडोअर थीम पार्क आहे. हे पार्क २ ते १६ वयोगटातील मुलांसाठी डिझाइन केलेले आहे आणि इथे १०० हून अधिक रोल-प्लेयिंग ऍक्टिव्हिटिज आहेत. ज्यामध्ये पायलट, डॉक्टर, शेफ किंवा फायरफायटर अशा प्रोफेशन्सचा समावेश आहे. या प्रोफेशनल्सची नक्कल मुलांना करायची असते.

(हेही वाचा – bba colleges in mumbai : मुंबईत BBA कॉलेजेसमध्ये घेतली जाते ’इतकी’ फी!)

एव्हिएशन अकादमी :

बोईंग-७३७ प्लेनवर आधारित अत्याधुनिक फ्लाइट सिम्युलेटर वापरून मुले पायलट म्हणून प्रशिक्षण घेऊ शकतात. ते केबिन क्रू म्हणून भूमिका बजावू शकतात, सुरक्षा प्रोटोकॉल आणि प्रवासी सेवेबद्दल शिकू शकतात.

ॲनिमेशन स्टुडिओ :

मुले स्टोरीबोर्डिंगपासून प्रोडक्शनपर्यंत ॲनिमेशन प्रक्रिया एक्सप्लोर करू शकतात आणि त्यांच्या स्वतःच्या ॲनिमेटेड स्टोरीज तयार करू शकतात. (kidzania mumbai)

चॉकलेट फॅक्टरी :

छोटे चॉकलेटर्स चॉकलेट बनवण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ शकतात.

बँकिंग आणि वित्त :

मुले बँक खाते उघडू शकतात, आर्थिक साक्षरता कौशल्ये शिकू शकतात आणि विविध बँकिंग क्रियांद्वारे त्यांचे KidZos (KidZania चलन) व्यवस्थापित करू शकतात.

(हेही वाचा – Ind vs Ban Test Series : भारतीय संघात ‘या’ दोन युवा तेज गोलंदाजांना संधी)

ऍक्टिंग अकादमी :

ज्यांना अभिनयात रस आहे, ते अभिनय तंत्र, तालीम आणि छोटी नाटके सादर करू शकतात.

सायकल दुरुस्ती आणि चाचणी प्रयोगशाळा :

मुले बाइक डिझायनर करू शकतात, बाइकची सुरक्षा आणि देखभाल याबद्दल शिकू शकतात.

स्पोर्ट्स एरिना :

मुले टेबल फूसबॉल आणि बिलियर्ड्स सारख्या क्रियाकलापांमध्ये त्यांची क्रीडा कौशल्ये विकसित करु शकतात.

अशा अनेक ऍक्टिव्हिटीमुळे KidZania ठरतं अत्यंत खास.

KidZania तिकीट दर :
  • बाळ (<२ वर्षे) : मोफत
  • लहान मुले (२-४ वर्षे) : पूर्ण दिवसासाठी रु. ७००
  • लहान मुले (४-१६ वर्षे) : पूर्ण दिवसासाठी रु. १,४५०
  • प्रौढ (१७-५९ वर्षे) : पूर्ण दिवसासाठी रु. ७००
  • ज्येष्ठ नागरिक (६०+ वर्षे) : पूर्ण दिवसासाठी रु. ३५० (kidzania mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.