tamhini ghat : घाटाचे सौंदर्य आणि धोके याबाबत संपूर्ण माहिती

208
tamhini ghat : घाटाचे सौंदर्य आणि धोके याबाबत संपूर्ण माहिती

महाराष्ट्र हा सुंदर डोंगर आणि घाटांनी नटलेला आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात फिरण्यासाठी अनेक नैसर्गिक ठिकाणे इथे आहेत. त्यापैकी एक सुंदर घाट म्हणजे ताम्हिणी घाट… ताम्हिणी घाट (tamhini ghat) महाराष्ट्रातील एक घाटरस्ता आहे. हा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव यांना जोडलेला आहे.

सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. शनिवारी आणि रविवारी या घाटात पर्यटकांची मोठी गर्दी असते. पुण्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेला हा भव्य पर्वतीय भाग खिंड, हिरवीगार झाडे, धबधबे, नद्या आणि धुके यांनी सजलेला आहे.

(हेही वाचा – bba colleges in mumbai : मुंबईत BBA कॉलेजेसमध्ये घेतली जाते ’इतकी’ फी!)

पावसाळ्यातील निसर्गसौंदर्यांचा आनंद लुटायचा असेल तर ताम्हिणी घाटाला आवर्जून भेट द्या. पावसाळ्यात तर इथले दृश्य इतके मनमोहक असते, आपण पृथ्वीवर आहोत, याचाच आपल्याला विसर पडतो. जणू स्वर्ग सुखाचा आनंद उपभोगत आहोत, असा भास आपल्याला होतो. इथे मुळशी धरणाचा नयनरम्य देखावा बघायला मिळतो.

ताम्हिणी घाट (tamhini ghat)  म्हणजेच पश्चिम घाटाची सह्याद्री पर्वतरांग, युनेस्कोच्या विपुल जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेले जागतिक वारसा स्थळ आहे. हा परिसर सुमारे १५० चौरस किलोमीटर एवढा आहे. हिरव्यागार जंगलातून जाणारे घाटातील वळणावळणाचे रस्ते पाहून आपले डोळे सुखावतात, पण निसर्गाचं रौद्र रुप पाहुन थोडी भीतीही वाटते.

(हेही वाचा – Ind vs Ban Test Series : भारतीय संघात ‘या’ दोन युवा तेज गोलंदाजांना संधी)

ताम्हिणी धबधबा, वळसे, कातळधर आणि वाल्मिकी हे या भागातील काही प्रमुख धबधबे आहेत. इथे येणे धोकादायक असले तरी सर्व सुरक्षात्मक काळजी घेऊन जर या धबधब्यांपर्यंत तुम्ही पोहोचलात तर तुम्हाला निसर्गाचं अद्भुत दृश्य पाहायला मिळेल. कोयना वन्यजीव अभयारण्य आणि भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य ताम्हिणी घाटाजवळंच आहे. त्यामुळे या अभयारण्यांमध्ये अनेक वनस्पती आणि प्राणी तुम्हाला आढळतील. सफारी व हायकिंगसाठी हा परिसर उत्तम आहे.

इथे तुम्ही व्हर राफ्टिंग, ऑफ-रोडिंग आणि रॅपलिंग अशा साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता. ताम्हिणी घाटात (tamhini ghat)  साग, शिवण, ऐन, आंबा, बांबू आणि विविध प्रकारच्या वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच बायसन, बिबट्या, हरिण, गिलहरी आणि विविध पक्षी तुम्हाला इथे पाहायला मिळतील.

(हेही वाचा – kidzania mumbai : KidZania मध्ये जा आणि करा खूप धम्माल; येथे मिळेल संपूर्ण गाईड!)

ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यातील प्लस व्हॅलीमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात. या व्हॅलीत पावसामुळे रस्ते हे निसरडे होतात. म्हणून अपघाताची शक्यता अधिक असते. अपघात होऊ शकतो. म्हणून वन्यजीव विभागाने अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा ताम्हिणी घाट (tamhini ghat) अपघातप्रवण असल्याने म्हणून इथे काही दिवस प्रवेश बंद केला जातो व विशेष दक्षता घेतली जाते. प्रवाशांनी या धोक्याची खबरदारी घेणे देखील आवश्यक आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.