शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी सकाळी आपले जावई सदानंद सुळे व नात रेवती सुळे यांच्यासोबत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले. यावर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उगारली. लालबागच्या राजाचे दर्शन घेणे म्हणजे ढोंगीपणा असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
निवडणुकीमुळे राजाची आठवण
प्रवीण दरेकर म्हणाले की, विधानसभा निवडणूक जवळ आल्याने शरद पवार (Sharad Pawar) यांना छत्रपती शिवाजी महाराज व लालबागचा राजाची आठवण झाली आहे. शरद पवार यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेणे म्हणजे ढोंगीपणा आहे. त्यांना 30 वर्षांनंतर लालबागच्या राजाची आठव झाली आहे. त्यामुळे माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की, त्यांना हिंदुत्त्वाच्या मुद्यावर सद्बुद्धी मिळो.
(हेही वाचा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी Bombay High Court कडून सात सदस्यीय समिती स्थापन)
निवडणुकीसाठी नौटंकी
ज्ञानेश्वर महाराव यांनी शरद पवारांपुढे प्रभू श्रीराम, विठुराया व हिंदुत्त्वाचा अवमान केला. पण त्यावर पवार काहीही बोलले नाही. उलट ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले. निवडणुकीसाठी नौटकी का होईना, पण लालबागच्या राजाने शरद पवारांना सद्बुद्धी दिली. पण महाराष्ट्राच्या जनतेला ही ढोंगी श्रद्धा दिसून येत आहे, असे खोचक विधानही त्यांनी यावेळी दिले. प्रवीण दरेकर यांनी यावेळी शरद पवारांनी 40 वर्षांनंतर किल्ले रायगडावर गेल्याचीही आठवण यावेळी काढली.
Join Our WhatsApp Community