पोलीस ठाण्यात पोलीस आणि लष्करासमोरच उत्सव मंडल या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच अन्य एका हिंदु विद्यार्थ्याला ईशनिंदेच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे. बांगलादेशातील (Bangladesh) जेसोर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापिठाच्या बायोमेडिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी आणि सनातन विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष कंकन विश्वास याच्यावर मुसलमान विद्यार्थ्यांनी इस्लामचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. या कंकन विश्वास याची विद्यापिठातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
(हेही वाचा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचविण्यासाठी Bombay High Court कडून सात सदस्यीय समिती स्थापन)
कट्टर हिंदुत्वासाठी शिक्षा करणे तातडीचे
बांगलादेशी (Bangladesh) माध्यमांच्या वृत्तानुसार, मुसलमान विद्यार्थ्यांनी शनिवार, ७ सप्टेंबर रोजी कंकन विश्वास नावाच्या हिंदू विद्यार्थ्याच्या विरोधात कारवाई करावी आणि त्याची हकालपट्टी करावी, यासाठी निदर्शने करून विद्यापीठ प्रशासनावर दबाव आणला. त्यांनी विद्यापिठाच्या कुलसचिवांकडे निवेदनही सादर केले. मुसलमान विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, कंकन विश्वास याला त्याच्या कट्टर हिंदुत्वासाठी शिक्षा करणे तातडीचे आहे. विश्वास धार्मिक चिथावणीखोर आणि अश्लील निंदा करणारा आहे. त्यामुळे त्याची विद्यापिठातून कायमची हकालपट्टी करावी. विश्वास यांनी अलीकडेच सोशल मीडियावर इस्लामविषयी अस्वीकारार्ह टिप्पणी केली असल्याचा मुसलमान विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापिठाने कंकन विश्वास याची हकालपट्टी केली आहे, असे वृत्त बांगलादेशी (Bangladesh) प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
Join Our WhatsApp Community