Red Sandalwood Smuggling : १० कोटींच्या रक्तचंदनाची तस्करी करणार्‍यांना अटक

90
Red Sandalwood Smuggling : १० कोटींच्या रक्तचंदनाची तस्करी करणार्‍यांना अटक
  • प्रतिनिधी

आंध्र प्रदेश येथून समुद्रमार्गे दुबईला निघालेला रक्तचंदनाने (Red Sandalwood) भरलेला कंटेनर सीमाशुल्क विभागाकडून जप्त करण्यात आला आहे. न्हावाशेवा बंदर येथे करण्यात आलेल्या कारवाईत कंटेनर चालक आणि मालकाला अटक करण्यात आली असून रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या तस्करांचा शोध घेण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेल्या रक्तचंदनाची १० कोटी रुपये किंमत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाकडून देण्यात आली आहे. कस्टम क्लिअरन्स दरम्यान तस्करांनी रक्तचंदनाचा कंटेनर बदलून त्याजागी वेस्टर्न कमोड टॉयलेट सीटचा कंटेनर दाखविण्यात आला होता. (Red Sandalwood Smuggling)

(हेही वाचा – महिला वकिलाचा अश्लील व्हिडिओ बनवून वारंवार बलात्कार; Samajwadi Party च्या नेत्याच्या विरोधात तक्रार)

अक्षय भाऊसाहेब आणि चालक गणेश महादेव सुखधरे असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून अक्षय भाऊसाहेब हा ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक असून सुखदरे हा चालक आहे. वेस्टर्न कमोड टॉयलेट सीटचा माल म्हणून घोषित केलेल्या सीलबंद कंटेनरने भरलेला ट्रक सुरेश्वर सीएफएस, जेएनपीटी सेझ, सेक्टर-७, नवी मुंबई येथे उभा होता. अधिकृतपणे मालवाहू शारजास्थित कंपनीसाठी डिलिव्हरी म्हणून हा कंटेनर घोषित करण्यात आला होता. कस्टम्सच्या विशेष गुप्तचर आणि अन्वेषण शाखेला गुप्त माहितीदाराकडून या कंटेनर संदर्भात माहिती मिळाली होती, या कंटेनरमधून तस्करीचे साहित्य दुबई येथे जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कस्टम्सच्या विशेष गुप्तचर आणि अन्वेषण शाखेने या कंटेनरची तपासणी करण्यासाठी परवानगी मिळवली होती. (Red Sandalwood Smuggling)

(हेही वाचा – Ajit Pawar चुका मान्य करू लागलेत; पवारांचे नक्की चालले तरी काय?)

कंटेनर ४ सप्टेंबर रोजी दुबई शारजाह येथे जाणाऱ्या जहाजातून जाणार होता. कस्टम अधिकाऱ्यांनी तत्पूर्वी या कंटेनरचे क्लिअरन्स प्रमाणपत्र तपासले असता त्यात वेस्टर्न कमोड टॉयलेट सीट असल्याची नमूद करण्यात आले होते. दरम्यान तस्करांकडून हा कंटेनर बदलून त्याच्या जागी रक्तचंदन लाकडाने (Red Sandalwood) भरलेला कंटेनर उभा करण्यात आला होता. १५ अधिकाऱ्यांच्या पथकाने ३ सप्टेंबरच्या रात्री केलेल्या कारवाईत रक्तचंदनाने भरलेला कंटेनर मिळून आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेला माल यूएईच्या शारजाह येथे निर्यात होणार होता. जप्त केलेल्या रक्तचंदनाच्या लाकडाची बाजारातील किंमत अंदाजे १० कोटी रुपये आहे. तपासात रक्त चंदनाची तस्करी करणारी संघटित टोळी असून या टोळीचे कनेक्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचेलेले आहे, सीमाशुल्क विभागाने ट्रान्सपोर्ट मालक आणि कंटेनर चालकाला अटक केली असून या गुन्ह्यातील मुख्य तस्करांचा कसून शोध घेण्यात येत आहे. (Red Sandalwood Smuggling)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.