पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत एका पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. रज्जाक महंमद मणेरी असे त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. रज्जाकच्या मृतदेहाच्या शेजारी त्याने स्वतःच्या रक्ताने लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये त्याने ‘आय एम सॉरी मॉम’ असे लिहिले आहे. तुर्तास पोलिस या घटनेची चौकशी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रज्जाक इंदापूर तहसीलच्या मणेरी येथे राहणारा आहे. मागील काही वर्षांपासून तो पुणे भोर तहसीलच्या राजगड पोलिस ठाण्यात कार्यरत होता.
रज्जाकचे कुटुंबीय मागील दोन दिवसांपासून त्याला काही कामानिमित्त बोलावत होते. जेव्हा त्याने फोन उचलला नाही, तेव्हा त्याचे नातेवाईक रज्जाक राहत असलेल्या ठिकाणी पोहचले, त्यावेळी रज्जाक पुण्यातील किकवी गावात राहत होता. घटनास्थळी जेव्हा जेव्हा रज्जाकचे कुटुंबीय पोहचले तेव्हा तेथे रज्जाक मृतावस्थेत त्यांना आढळून आला.
(हेही वाचा : पतीच्या निधनाने नाही, तर एका फ्लॅट धारकाच्या त्रासाला कंटाळून तिने उचलले ‘हे’ पाऊल!)
सुसाईट नोट मिळाली!
कुटुंबियांना जेव्हा रज्जाकने आत्महत्या केल्याचे दिसले, तेव्हा त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी मृतदेहाच्या ठिकाणचा पंचनामा केला असता त्यांना सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये रज्जाकने त्याच्या रक्ताने ‘सॉरी मॉम’ असे लिहिले होते. मृत्यूच्या आधी रज्जाकने नस कापली होती. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलिस या घटनेची चौकशी करत आहेत. मात्र पोलिस कर्मचारी रज्जाकने आत्महत्या का केली, याबाबत नक्की कारण समोर आले नाही.
Join Our WhatsApp Community