‘गद्दारांशी आपल्याला मैत्री नको’ असे ठणकावत रणजित सावरकरांनी India Bangladesh test series ला केला विरोध

मी हिंदूंना आवाहन करतो की, आपल्याकडे एकच शस्त्र आहे, ते म्हणजे खिशातील पैसे. आपला पैसा शत्रू राष्ट्रांत कदापि जाता कामा नये, अशी प्रतिज्ञा हिंदूंनी घेतली पाहिजे, असे रणजित सावरकर म्हणाले.

127

भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट कसोटी मालिकेला (India Bangladesh test series) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी कडाडून विरोध केला आहे. ‘ते गद्दार आहेत, त्यांच्याशी मैत्री नकोच’, अशा स्पष्ट शब्दांत रणजित सावरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

India Bangladesh test series १९ सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. याविषयावर सुदर्शन टीव्ही या वृत्तवाहिनीवरील ‘बिंधास्त बोल’ या कार्यक्रमात रणजित सावरकर म्हणाले की, भारतीय जनतेने या कसोटी मालिकेवर (India Bangladesh test series) बहिष्कार टाकला पाहिजे. बांगलादेशावर आर्थिक बहिष्कार टाकला पाहिजे. या क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून आपण त्यांना केवळ मान्यताच देत नाही, तर आपण त्यांना अर्थ पुरवठाही करत आहोत, असेही सावरकर म्हणाले.

‘हिंदूच मारले जातात, हा इतिहास आहे’

1946मध्ये बांगलादेशातील नोआखली आणि टिपरा जिल्ह्यात एकही हिंदू उरला नव्हता. आपण सर्वजण इतिहास विसरत चाललो आहोत. त्यानंतर 1971 च्या आधीच्या पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानी लष्कराने जे अत्याचार केले ते हिंदूंवरच केले. त्यामुळे 1971 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर हल्ला केला आणि त्याचे दोन तुकडे झाले. आज इतक्या वर्षांनंतर भारतातील जमात-ए-इस्लामी, पाकिस्तानातील जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेशातील जमात-ए-इस्लामी एकत्र आले आहेत. एका कुटिल षडयंत्रामुळे बांगलादेशातील सरकार बदलले, आताचे सरकार हे हिंदूविरोधी, भारत विरोधी आहे, असेही रणजित सावरकर म्हणाले.

(हेही वाचा

8 कोटी हिंदूंची हत्या

1947 पासून आतापर्यंत बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सुमारे 8 कोटी हिंदू मारले गेले आहेत. त्याविरोधात हिंदूंनी चकार शब्द काढला नाही. काश्मीरमध्ये 1989 मध्ये जे घडले, त्यापेक्षा अधिक हत्या आज बांगलादेशात होत आहेत. हा हिंदू धर्मावर आघात आहे. आपल्या सरकारने आम्ही बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करू, असे आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता सरकारने केली पाहिजे, असेही रणजित सावरकर म्हणाले.

‘गद्दारांशी संबंध नको’

अफगाणिस्तान, बांगलादेशात काहीही घडले, तेथील दोन राजकीय पक्षांमध्ये वाद झाला, अथवा कोणतीही घटना घडली, तरी तिथे हिंदूच मारले जातात. आपल्याही देशात CAA विरोधात आंदोलन झाले, त्यातही हिंदूच मारले गेले. जोवर हिंदू जागरूक होत नाही तोवर हे असेच होत राहणार आहे. मी हिंदूंना आवाहन करतो की, आपल्याकडे एकच शस्त्र आहे, ते म्हणजे खिशातील पैसे. आपला पैसा शत्रू राष्ट्रांत कदापि जाता कामा नये. अशी प्रतिज्ञा हिंदूंनी घेतली पाहिजे. आपण त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवता कामा नये. खेळाविषयी भावनिक न होता, आपण भारत – बांगलादेश कसोटी मालिकेवर (India Bangladesh test series) बहिष्कार टाकला पाहिजे. ते  गद्दार आहेत, त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवता कामा नये, असेही रणजित सावरकर म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.