कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बंगालमधील कर्तव्यावर गैरहजर रहाणाऱ्या डॉक्टरांना मंगळवार, १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत हजर रहाण्याचा अल्टिमेटम दिला आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत डॉक्टर ड्यूटीवर परतले, तर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. न परतल्यास राज्य सरकार शिस्तभंगाची कारवाई करू शकते, असे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपिठाने म्हटले आहे. (Kolkata rape case)
(हेही वाचा – Krida Mahakumbh वरील खर्च अडीच कोटींच्या वर पोहोचला)
विरोध संपणारा नाही – इंडियन मेडिकल असोसिएशन
आम्ही कनिष्ठ डॉक्टरांसोबत आहोत. हा विरोध संपणारा नाही. येत्या काही दिवसांत तो आणखी तीव्र होणार आहे. पीडितेला लवकर न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. त्याच वेळी न्यायालयाने सांगितले की, अद्याप या प्रकरणाचा कोणताही चालान अहवाल आला नाही, ज्याच्या आधारावर शवविच्छेदन केले जाते. चालान अहवालाशिवाय शवविच्छेदन करण्यात आले का, असा प्रश्न आयएमएने (इंडियन मेडिकल असोसिएशन) उपस्थित केला आहे.
काय आहे तपासाची स्थिती ?
३,७०० सीसीटीव्ही आधीच कार्यरत आहेत, असा दावा पश्चिम बंगाल सरकारने केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. ३० दिवसांच्या तपासानंतर आतापर्यंत फक्त एक आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे. १२ पॉलीग्राफ चाचण्या आणि सुमारे १०० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह सापडला, तेव्हा ती अर्धनग्न अवस्थेत होती. तिच्या शरीरावर जखमा होत्या. पीडितेचे फोटो अजूनही सोशल मीडियावर आहेत. ते हटवण्याच्या सूचना द्याव्यात, अशी विनंती वकील गीता लुथरा यांनी केली आहे. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पीडितेच्या मृतदेहाची छायाचित्रे तपासाला नुकसान पोहोचवू शकतात. सोशल मीडियावरून सर्व फोटो त्वरित काढून टाकावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. (Kolkata rape case)
हेही पहा –