केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांचा मुंबई दौरा कालच आटपला व ते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. अमित शाह रविवारी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गणपतींचे, तसेच लालबागचा राजा व आ. आशिष शेलार यांच्या मंडळाच्या गणरायाचे दर्शन अमित शाह यांनी घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत होते. या दौऱ्यात अमित शाह यांच्यासोबत अजित पवार (Ajit Pawar) न दिसल्याने चर्चा रंगली. शेवटी शाह मुंबईहून रवाना होत असताना अजित पवार विमानतळावर पोहोचले आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह त्यांनी शाह यांच्याशी चर्चा केली.
(हेही वाचा – Kolkata rape case : डॉक्टरांना सर्वोच्च न्यायालयाचा अल्टिमेटम; कामावर परतावे, अन्यथा…)
पवार नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
गेल्याच आठवड्यात अजित पवार यांच्यावर शिवसेनेचे दोन मंत्री आणि भाजपच्या काही नेत्यांनी अजित पवार यांच्यावर जाहीर टीका केलेली होती. या पार्श्वभूमीवर पवार नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. त्यातच ते आजारी असल्याने राष्ट्रपतींच्या कार्यक्रमांसह काही कार्यक्रमांना उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार का, अशी चर्चा रंगली होती. परंतु अमित शाह निघतांना का असेना पवार यांनी त्यांची भेट घेतली आहे.
अमित शाह यांच्यासोबत रविवारी रात्री केवळ भाजप नेत्यांची ती बैठक होती. त्यात वावगे काहीही नाही, पण वेगवेगळ्या अफवा उगीच पसरविल्या जात आहेत. जागावाटपाबाबत अंतिम निर्णय दिल्लीतच होणार आहे. त्या आधी आम्ही तिन्ही पक्ष चर्चा करू. मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल, असा शब्द अमित शाह यांनी आम्हाला आजच्या चर्चेत दिला आहे, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.
गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी यासंदर्भात स्वतंत्रपणे बंदद्वार चर्चा केली. यामध्ये जागावाटपाविषयी बोलणी झाल्याची चर्चा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community