कर्करोगावरची औषधे होणार स्वस्त; GST Council च्या बैठकीत घोषणा

109
कर्करोगावरची औषधे होणार स्वस्त; GST Council च्या बैठकीत घोषणा
कर्करोगावरची औषधे होणार स्वस्त; GST Council च्या बैठकीत घोषणा

आता कर्करोगावरील औषधांवर (Cancer drugs) 12 टक्क्यांऐवजी 5 टक्के एवढा जीएसटी लावण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता कमी किंमतीत औषधे उपलब्ध होणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, ९ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेची ५४ वी बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

(हेही वाचा – मुंबई विमानतळावर Amit Shah जाता जाता अजित पवारांनी घेतली भेट)

जीएसटी परिषदेने आरोग्य आणि जीवन विम्याच्या प्रीमियम पेमेंटवरील करासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. याचसह वस्तू आणि सेवा कर परिषदेने सध्या शैक्षणिक संस्थांना संशोधनासाठी मिळणाऱ्या अनुदानावरील जीएसटीचा मुद्दा फिटमेंट समितीकडे पाठवला आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर परिषद यासंदर्भात निर्णय घेईल. ऑनलाइन पेमेंटवरील वस्तू आणि सेवा कराचे प्रकरणही फिटमेंट कमिटीकडे पाठवण्यात आले आहे. या समितीमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांशिवाय सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश आहे.

या बैठकीत धार्मिक यात्रा करणाऱ्यांनाही दिलासा देण्यात आला आहे. धार्मिक यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेचा वापर केल्यास आता 18 टक्क्यांऐवजी 5 टक्के जीएसटीच द्यावा लागणार आहे. उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रेमचंद अग्रवाल यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. ते म्हणाले, जीएसटी परिषदेने आमची मागणी मान्य केली आहे. ही सुविधा शेअरिंग हेलिकॉप्टर सेवा घेणाऱ्यांनाच मिळणार आहे. चार्टर्ड हेलिकॉप्टर सेवेचा लाभ घेतल्यास 18 टक्के एवढाच जीएसटी भरावा लागेल.

या बैठकीत आरोग्य विमा (Health Insurance) आणि जीवन विमा (Life Insurance) यांच्या हफ्त्यासाठी लागणारा जीएसटी कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली. यानंतर हे प्रकरण अधिक अभ्यासासाठी ग्रुप ऑफ मिनिस्टर्सकडे (GOM) पाठवण्यात आले. त्यांना ऑक्टोबर, 2024 पर्यंत आपला अहवाल तयार करावा लागेल. यावर आता नोव्हेंबर, 2024 मध्ये होणाऱ्या जीएसटी काउंसिलच्या बैठकीत चर्चा होईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.