इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) गुवाहाटीचा संगणक विज्ञान (Computer Science) शाखेच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी सोमवार, 9 सप्टेंबर रोजी त्याच्या वसतीगृहाच्या खोलीत मृतावस्थेत आढळला. उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला हा विद्यार्थी ब्रह्मपुत्रा वसतीगृहात रहात होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. या विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (IIT Guwahati)
(हेही वाचा – Shree Tuljabhavani Mandir संस्थानची प्रशासनिक गतिमानता वाढणार)
मृत विद्यार्थी शारीरिक समस्यांनी ग्रस्त आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ
विद्यार्थ्याच्या आत्महत्येची माहिती मिळताच, त्याला न्याय मिळावा आणि आय.आय.टी.मध्ये शिकणाऱ्यांना आवश्यक मानसिक साहाय्य मिळावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसारात आंदोलन केले. या वेळी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आरोप केला की, मृत विद्यार्थी शारीरिक समस्यांनी ग्रस्त होता आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. तो विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. त्या विद्यार्थ्याने आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे विद्यार्थ्याचे मानसिक आरोग्य आणखी बिघडले.
या वर्षभरात गुवाहाटी येथील आयआयटीमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू होण्याची ही चौथी घटना आहे. यापूर्वी 9 ऑगस्ट रोजी एका विद्यार्थिनीचा मृतदेह तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. (IIT Guwahati)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community