विवान कारुळकर यांच्या ‘सनातन धर्म : सर्व विज्ञानाचा खरा स्रोत’ पुस्तकाचे लालबागच्या राजाच्या दरबारी प्रकाशन

85
विवान कारुळकर यांच्या ‘सनातन धर्म : सर्व विज्ञानाचा खरा स्रोत’ पुस्तकाचे लालबागच्या राजाच्या दरबारी प्रकाशन
विवान कारुळकर यांच्या ‘सनातन धर्म : सर्व विज्ञानाचा खरा स्रोत’ पुस्तकाचे लालबागच्या राजाच्या दरबारी प्रकाशन

कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर यांचे पुत्र विवान कारुळकर (Vivaan Karulkar) यांच्या ‘सनातन धर्म : सर्व विज्ञानाचा खरा स्रोत’ या पुस्तकाच्या या मराठी आवृत्तीचे प्रकाशन लालबागचा राजाच्या दरबारात झाले. ९ सप्टेंबरला रोजी पुस्तकाच्या मराठी आवृत्तीची प्रत लालबागच्या राजाच्या (lalbaugcha raja) चरणी अर्पण करण्यात आली.

(हेही वाचा – IIT Guwahati च्या विद्यार्थ्याची वसतीगृहात आत्महत्या; वर्षभरातील चौथी घटना)

विवान कारुळकर (Vivaan Karulkar) यांचे हे पुस्तक तीन भाषांत प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या पहिल्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन अयोध्येतील राम मंदिरात झाले होते. राम मंदिर ट्रस्टचे चंपतराय यांनीही या पुस्तकाबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत. नीलिमा देशपांडे यांनी मराठीतील या आवृत्तीचे भाषांतर केले आहे. भारतीय सेनादलानेही धार्मिक साहित्यात दिलेल्या योगदानाबद्दल पदक देऊन विवान यांना गौरवले होते. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आले.

पुस्तकाची विदेशवारी

या पुस्तकाच्या लेखनासाठी विवान कारुळकर यांच्या नावाचा समावेश ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये (Asia Book of Records) झालेला आहे. सनातन धर्मावर लिहिणारा सर्वात तरुण लेखक म्हणून ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने विवान कारूळकर यांना गौरवले आहे. ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले आहे. लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमधील रॉयल फॅमिलीकडून विवान याला त्याच्या कौतुकास्पद कामासाठी बॅज आणि नाणे देण्यात आले. विवान यांचे पुस्तक स्वीत्झर्लंडमध्येही पोहोचले. स्वीत्झर्लंडच्या संसदीय समितीचे प्रमुख डॉ. निक गुग्गर यांनी विवानच्या या लेखनाचे कौतुक केले.

‘या’ मान्यवरांनी केले कौतुक

‘नासा’तील शास्त्रज्ञ मोहम्मद सैदुल अहसान व मोहम्मद सैफ आलम यांनीही विवानच्या पुस्तकाचे कौतुक केले. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल यांनीही विवानचे या पुस्तकाचे कौतुक केले होते. जैन धर्माचे आचार्य महाश्रमणजी यांनीही पुस्तक पाहून विवान यांना भरपूर आशीर्वाद दिले. भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, सुशील कुल्हारी, राजस्थानचे आयकर खात्याचे प्रिन्सिपल डायरेक्टर सुधांशू शेखर झा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण परदेशी, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जितो संघटनेचे प.पू. गुरुदेव नयपद्मसागरजी, कस्टम विभागाचे आयुक्त अस्लम हसन, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे खासगी सचिव एस.के. जाधव यांनीही या प्रयत्नाबद्दल विवान कारूळकर (Vivaan Karulkar) यांना शाबासकीची थाप दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.