Manholes : मलवाहिनींच्या जीएस मॅपिंग सर्व्हेतच त्रुटी: तब्बल १३ हजारांहून मॅनहोल्स हे मॅपिंगमध्ये जुळत नाहीत

594
Manholes : मलवाहिन्यांच्या साफसफाईचा मार्ग मोकळा; 'त्या' सात वाहनांच्या देखभाली आणि प्रचालनासाठी सुमारे १७ कोटींचा खर्च
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबईतील मलनि:सारण प्रचालन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मलवाहिनी आणि त्यांच्या मॅनहोल्स (Manholes) तसेच व्हेंट शाफ्ट आदींचे जीआएस प्रणाली अंतर्गत डिजिटल स्वरुपात आरेखित करण्यात आले. परंतु यापूर्वी केलेल्या जीआयएस मॅपिंगच्या सर्वे कामांची प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर तब्बल १३००० हून अधिक मॅनहोल्स हे अचूक दर्शवले जात नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे महापालिकेच्यावतीने आता जीआयएस मॅपिंगमधील त्रुटी दूर करण्यासाठी जीपीएस (GPS) व टोटल स्टेशन या उपकरणांचा वापर करून पुनः सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी ७ कोटी ३५ लाखांचा खर्च केला जाणार आहे.

तब्बल दहा वर्षांपुर्वी डिजी पीएस प्रणालीचा वापर

मुंबई महानगरपालिकेच्या मलनिःसारण प्रचालन विभागाकडे, ७५००० पेक्षा जास्त मॅनहोल, ४००० पेक्षा जास्त व्हेंट शाफ्ट इ. चा समावेश असलेली सुमारे २०५० कि.मी. पेक्षा लांब मलनिःसारण प्रणाली आहे. ही प्रणाली Enterprise GIS अंतर्गत ArcGIS platform वर digital स्वरुपात आरेखित करण्यात आली आहे. सन २०१४-१५ पासून ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीमवर आधारित २ नग रेफरंस बेस स्टेशन आणि २८ नग जीएनएसएस रोव्हर्स यांचा समावेश असलेल्या डिफरेंशियल ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाईट (डी.जी.पी.एस.) प्रणालीचा वापर विभागात सुरु झाला. (Manholes)

(हेही वाचा – IIT Guwahati च्या विद्यार्थ्याची वसतीगृहात आत्महत्या; वर्षभरातील चौथी घटना)

सर्वेत त्रुटी

मिळालेल्या माहितीनुसार, मलनिःसारण प्रचालने खात्याच्या मालमत्तेचे, म्हणजेच मॅनहोल व्हेंट शाफ्ट इ. चे, भौगोलिक निर्देशांक टिपण्यासाठी या प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मलनिःसारण प्रचालन विभागातील कर्मचारी आणि तांत्रिक कामगार यांच्या सोबतीने सुमारे २०१९ पर्यंत सर्व्हे करून सर्व प्रणालीचा अक्षांश व रेखांकानुरूप पाहणी करण्यात आली. संपूर्ण मालमत्ता १ मीटर अंतरापर्यंत अचूक रेखांकित करण्याची येथे अपेक्षा करण्यात आली होती. त्यानंतर या सर्व्हेची सर्व माहिती पोस्ट प्रोग्रेसिव्ह (Post Processing) स्वरुपात पडताळली असता त्यामध्ये ही त्रुटी आढळून आल्या.  (Manholes)

प्रत्यक्ष मॅनहोल्स आणि मॅपिंग मॅनहोल्स जुळत नाही

सर्व्हे केलेल्या सुमारे ६७,३६५ मॅनहोल्सपैकी १३००० पेक्षा जास्त मॅनहोल्सचे मॅपिंग अचूक नव्हते. उंच इमारती, मोठी झाडे यामुळे अशा त्रुटी येण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे पातळीत असलेल्या मॅनहोल्स पैकी अनेक मॅनहोल्स प्रत्यक्ष ठिकाणी असलेल्या मॅनहोल्ससोबत अनुक्रमांक व संख्येनुरूप मिळते जुळते नव्हते. या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी जीपीएस GPS व टोटल स्टेशन या उपकरणांचा वापर करून पुनः सर्व्हे करणे गरजेचे आहे. मलनि सारण प्रचालन विभागाने एकंदर विस्तार लक्षात घेता बाहेरील या क्षेत्रातील संस्थेद्वारे हे काम करून घेण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा – विवान कारुळकर यांच्या ‘सनातन धर्म : सर्व विज्ञानाचा खरा स्रोत’ पुस्तकाचे लालबागच्या राजाच्या दरबारी प्रकाशन)

त्रुटी करण्यासाठी नव्याने सर्वे

मलनिःसारण प्रचालन विभागात सध्या ArcGIS, WebGIS, DVM, RWTS यांसारख्या सॉफ्टवेअर प्रणाली कार्यरत आहेत. SUMC विभागाद्वारे या प्रणालींशी निगडीत माहिती नियमित अद्ययावत केली जात असते. मलवाहिनींशी संबंधित सर्वे करताना निर्माण झालेली माहिती या सर्व प्रणालींवर लोड करणे गरजेचे असते. त्यामुळे संपूर्ण मुंबईचा मलवाहिनींशी निगडीत सर्वे झाल्यानंतर ती माहिती सध्याच्या सर्व प्रणालींमध्ये योग्य त्या प्रकारे अद्ययावत करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे यापूर्वी केलेल्या जीआयएस मॅपिंग पद्धतीतील त्रुटी करण्यासाठी नव्याने सर्वे करण्यात येणार असून यासाठी सुमारे साडेसात कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कामासाठी पायोनिअर फाऊंडेशन इंजिनिअर्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Manholes)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.