chocolate modak recipe : गणेशोत्सवात स्वादिष्ट चॉकलेट मोदक बनवा असे!

114
chocolate modak recipe : गणेशोत्सवात स्वादिष्ट चॉकलेट मोदक बनवा असे!

गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया! गणपती बाप्पाचं आगमन झाल्यामुळे सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. घरे आणि मंडळे माणसांनी गजबजलेली आहेत. गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी छान छान डेकोरेशन्स, चलचित्रे, नैवेद्य, मोदक बनवून लोक हा सण साजरा करतात.

पूर्वी उकडीचे आणि तळणीचे मोदक असायचे. आता विविध मिठाईचे मोदक बनवले जातात. मग त्यात आणखी अनेक बदल होत गेले आणि आता तर चॅकलेटचे मोदकही बनवले जातात आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला जातो. बाप्पा इतका गोड आहे की काहीही गोड मानून घेतो. आज आपण chocolate चे मोदक कसे बनवायचे हे शिकणार आहोत. चला तर मग… (chocolate modak recipe)

(हेही वाचा – rpf constable salary : RPF constable कोण असतो आणि किती असतं मासिक वेतन?)

साहित्य :

१ कप किसलेले चॉकलेट किंवा चॉकलेट चिप्स
१/२ कप कंडेन्स्ड दूध
१/४ कप दूध पावडर
१/४ कप ओले किसलेले खोबरे
१/२ टीस्पून वेलची पावडर
मोदकाचे साचे

सूचना :

१. आधी चॉकलेट वितळवा :

मायक्रोवेव्ह-सुरक्षित भांड्यात किसलेले चॉकलेट किंवा चॉकलेट चिप्स मायक्रोवेव्हमध्ये वितळवा, दर गुळगुळीत होईपर्यंत ३० सेकंदांनी ढवळत रहा.

२. साहित्य एकत्र करा :

वितळलेल्या चॉकलेटमध्ये कंडेन्स्ड मिल्क, मिल्क पावडर, खोबरे आणि वेलची पावडर घाला. सर्व साहित्य एकत्र होईपर्यंत चांगले मिसळा. (chocolate modak recipe)

(हेही वाचा – Manholes : मलवाहिनींच्या जीएस मॅपिंग सर्व्हेतच त्रुटी: तब्बल १३ हजारांहून मॅनहोल्स हे मॅपिंगमध्ये जुळत नाहीत)

३. मोदकांचा आकार द्या :

मोदकांच्या साच्यांना थोडं तुप किंवा तेल लावून ग्रीस करा. साच्यांमध्ये चॉकलेटचे मिश्रण भरा आणि घट्ट दाबा. जर तुमच्याकडे साचे नसेल तर तुम्ही हाताने आकार देऊ शकता.

४. मोदक सेट करा :

आकाराचे मोदक प्लेटवर ठेवा आणि सेट होण्यासाठी सुमारे ३० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा.

आता तुमचे चॉकलेटचे मोदक तयार झाले आहेत. मग बाप्पाला नैवेद्य दाखवून त्या प्रसादावर ताव मारा पाहू! (chocolate modak recipe)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.