- प्रतिनिधी
लघुवाद न्यायालयाचा अनुवादक विशाल सावंतला २५ लाख रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी हॉटेल कामत येथे सापळा रचून अटक केली आहे. विशाल सावंत यांनी तक्रारदार यांच्या बाजूने निकाल लावून देतो असे आश्वासन देऊन २५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती अशी माहिती एसीबीने दिली आहे.
(हेही वाचा – ED ने दिल्लीऐवजी कोलकातामध्ये यावे, अशी मागणी करणारी TMC चे अभिषेक बॅनर्जी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करणारे तक्रारदार ६६ वर्षाचे असून हॉटेल व्यवसायिक आहे, हॉटेलच्या मालकी हक्काबाबत लघुवाद न्यायालयात त्यांचा दावा दाखल असून प्रकरण अंतिम टप्प्यात होतं. या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देतो असं आश्वासन देऊन लघुवाद न्यायालयाचा अनुवादक विशाल सावंत यांनी तक्रारदाराकडे २५ लाख रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी केली होती.
(हेही वाचा – ट्रान्स हार्बरनंतर आता Western Railway विस्कळीत)
दरम्यान तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.या तक्रारीची शहानिशा करून एसीबी ने सोमवारी अशोक शॉपिंग सेंटर, कामत हॉटेलसमोर सापळा लावला होता, या सापळा दरम्यान तक्रारदार यांच्याकडून लाचेची २५ लाखांची रक्कम स्वीकारताना सावंत यांना रंगेहात पकडण्यात आले. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांनी दिली आहे. (Bribe)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community