MIM स्वबळावर लढणार? पाच उमेदवारांची केली घोषणा

139
MIM स्वबळावर लढणार? पाच उमेदवारांची केली घोषणा
  • प्रतिनिधी

राज्यात विधानसभेचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळत आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सात उमेदवारांची घोषणा केली आहे मनसे पाठोपाठ आता एमआयएमकडूनही (MIM) पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

(हेही वाचा – ट्रान्स हार्बरनंतर आता Western Railway विस्कळीत)

एमआयएमने (MIM) महाविकास आघाडीला सामील होण्यासाठी प्रस्ताव दिला होता. सप्टेंबर मध्यापर्यंत निर्णय न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारादेखील दिला होता. महाविकास आघाडीकडून कोणताही निर्णय न झाल्याने एमआयएमनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून आपले ५ उमेदवार जाहीर केले आहेत.

(हेही वाचा – जगप्रसिद्ध चित्रकार Sayed Haider Raza यांची अडीच कोटींची पेंटिंग चोरीला, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल)

यामध्ये माजी खासदार आणि एमआयएमचे (MIM) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना छत्रपती संभाजीनगरमधून, फारूक शहांना धुळ्यामधून, मुक्ती इस्माईल यांना मालेगावमधून, फारूक शाब्दी यांना सोलापूरमधून, तर रईस लष्करीया यांना मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एमआयएमचे प्रमुख खासदार अससुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी ही घोषणा केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.