हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने मंगळवार (10 सप्टेंबर) रोजी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत मात्र भाजपाने (BJP) 2 जागेवर मुस्लिम उमेदवार दिले आहेत. आतापर्यंत भाजपाने हरियाणातील ९० पैकी ८८ जागांसाठी उमेदवार घोषित केले आहे.
गेल्या आठवड्यात उमेदवारांची पहिली यादी जाहीर
पहिल्या यादीत भाजपाने (BJP) ६७ जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. अद्याप दोन जागांवर उमेदवारी घोषित करणे बाकी आहे. भाजपाने फिरोजपूर झिरका मतदारसंघातून नसीम अहमद आणि पुन्हाणा मतदारसंघातून एजाज खान यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय, जुलाना जागेवर भाजपाने (BJP) कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर कुस्तीपटू विनेश फोगट काँग्रेसच्या तिकीटावर येथून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपाने पेहोवा जागेवर उमेदवार बदलला आहे. याआधी भाजपाने कंवलजीत सिंह अजराना यांना तिकीट दिले होते. मात्र, विरोध असल्याने त्यांनी तिकीट परत केले. आता भाजपाने (BJP) या जागेसाठी जय भगवान शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. ही यादी जाहीर झाल्यानंतर तिकीट मिळाले नाही, म्हणून भाजपाचे अनेक नेते पक्षावर कमालीचेच नारज असल्याचे दिसून आले. तसेच, काही नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. निडणुकीपूर्वी नेतेच नाराज झाल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर पक्षाने समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
Join Our WhatsApp Community