गृहमंत्री असताना काश्मीरला जायला भीती वाटायची; Sushilkumar Shinde यांच्या वक्तव्याने काँग्रेसची गोची

402

मी गृहमंत्री असताना मला कुणी सल्ला दिला होता की, आपण इकडे तिकडे भटकण्याऐवजी लाल चौकात जा. तेथे एखादे भाषण करा, तेथील लोकांना भेटा, डल तलावाला भेट द्या. असे केल्यास तेथील लोकांना वाटेल की, किती चांगला गृहमंत्री आहे. जो न घाबरता काश्मीरात जातो. यामुळे प्रसिद्ध तर मिळाली, पण खरे तर माझी फाट*** होती,’ असे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी म्हटले. सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याने त्याकाळी सत्तेत असणाऱ्या कॉँग्रेस सरकारच्या कर्तुत्ववार शंका निर्माण झाली आहे.

(हेही वाचा बदलापूरच्या घटनेनंतर राज्यातील आश्रमशाळांमध्ये CCTV बसवण्याचा सरकारचा आदेश; त्यासाठी बनवली कार्यपद्धत)

‘फाइव डेकेड्स ऑफ पॉलिटिक्स’ या राशिद किदवई यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि दिग्विजय सिंह आदी उपस्थित होते. माजी गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपाने पलटवार केला आहे. भाजपा प्रवक्ता शेहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया पोस्ट करत, काँग्रेसने शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यूपीए काळातील गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जम्मू-काश्मीरात जाण्याची भीती वाटत होती, अशी कबुली दिली. मात्र, आज राहुल गांधी सहजपणे काश्मिरात भारत जोडो यात्रा आणि स्नो फाइट करताना दिसू शकतात. मात्र नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा दहशतीच्या काळात घेऊन जायचे आहे, असे म्हटले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.