जॉर्जटाऊन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) भारतात आरक्षण किती दिवस सुरू राहणार, असा सवाल केला. त्यावर राहुल गांधी यांनी, ‘जेव्हा भारतात निष्पक्षता (आरक्षणाच्या बाबतीत) येईल, तेव्हाच आरक्षण संपवण्याचा विचार करू. सध्या भारतात तशी परिस्थिती नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
एकीकडे भारतात जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करायची, त्यायोगे ओबीसी आणि मागास जातीच्या वर्गासाठी आरक्षणाचा टक्का वाढवण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करायची, राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे त्यांचे ओबीसी, दलित वर्गावरील प्रेम आणि संविधाना विषयीचा उन्माळा ढोंग असल्याचे सिद्ध झाले आहे.
“काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. वॉशिंग्टनमधील जॉर्जटाउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, जेव्हा भारतात आरक्षणाबाबत निष्पक्षता असेल तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू. यावर आता भाजपाचे मित्रपक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
तिथे जाऊन आरक्षणावर चर्चा करण्याची गरज नाही – आठवले
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षणावर चर्चा करण्याची आवश्यक नाही. जेव्हा कनिष्ठ जातीचे लोक वरती येतील, तेव्हाच आरक्षण संपेल, इथे प्रत्येकाला सामाजिक न्यायासोबत आर्थिक न्याय मिळायला हवा, असेही रामदास आठवले म्हणाले. राहुल गांधी जेव्हा भारताबाहेर जातात तेव्हा ते भारताच्या विरोधात बोलतात. संविधान धोक्यात नाही. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत संविधानाला काहीही धोका होणार नाही, असेही रामदास आठवले म्हणाले.
Join Our WhatsApp Community