Rahul Gandhi यांना जनतेचा प्रश्न; अमेरिकेत मुलाखत घेणाऱ्याची जात का नाही विचारली?

125
Rahul Gandhi यांना जनतेचा प्रश्न; अमेरिकेत मुलाखत घेणाऱ्याची जात का नाही विचारली?
  • खास प्रतिनिधी

जातनिहाय जनगणनेच्या भूताने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पाठ अमेरिकेच्या दौऱ्यावरही सोडली नाही. एका सभागृहात झालेल्या मुलाखतीची लिंक राहुल यांनी ‘X’वर पोस्ट केली आणि लोकांनी त्यांनाच प्रश्न केला की श्रोत्यांमध्ये किती मागासवर्ग, आदिवासी किंवा इतर मागासवर्ग प्रवर्गातील आहेत यांचे सर्वेक्षण केले आहे का?

देशाची बदनामी

नेटकऱ्यांनी त्यांनाच धारेवर धरले. भारतात असताना देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधी यांनी परदेशात पुन्हा भारताची बदनामी करण्यास सुरूवात केली. भाजपा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीका केली.

(हेही वाचा – Cemetery : वर्सोव्यात बोहरी मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान)

तुम्ही भारताचे ‘युनूस’

‘तिथे कुणाची जात का नाही विचारली?. किती दलित जातीचे आहेत, हे जाणून घ्यायचे नाही का? आरक्षणामुळे कुशल खुल्या गटातील तरुण हा देश सोडून जात आहेत, तुमच्यासारख्यांना आरक्षण ५० टक्क्यांच्या वर वाढवायचे आहे. मतपेटीच्या राजकारणाशिवाय तुम्ही काहीही करत नाही, तुम्ही भारतासाठी पूर्णपणे कचरा आणि धोका आहात. तुम्ही भारताचे ‘युनूस’ आहात ज्याना भारताचा नाश करायचा आहे,’ असे स्पष्ट मत एकाने ‘X’ वर मांडले.

मुलाखतकार दलित आहे की ओबीसी?

‘सभागृहातील विद्यार्थ्याची जातनिहाय गणना केली? मुलाखतकार दलित आहे की ओबीसी?’ असा सवाल एका नेटकार्याने करून राहुल गांधी यांची पंचाईत केली. ‘ही व्यक्ति बीजेपी, मोदी, अडाणी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशिवाय बाकी काही विचार करू शकत नाही आणि काही सकारात्मक बोलू शकत नाही’ असे एकाने मत व्यक्त केले. (Rahul Gandhi)

(हेही वाचा – आरक्षण संपवण्याविषयी Rahul Gandhi यांचे विधान; काँग्रेस अडचणीत)

भारत की बुराई करना आपको शोभा नहीं देता

अनेकांनी तर राहुल यांच्याकडून परदेशात जाऊन करण्यात येत असलेल्या टीकेवर आसूड ओढले. ‘आप विदेशी ताकतों के हाथों में खेल रहे हैं। आपको संभालना चाहिए ऐसे बयान देने से। भारत में आप नेता प्रतिपक्ष हैं। आपकी कुछ जिम्मेवारी बनती है। सत्ता पक्ष से आपका विरोधाभास हो सकता है। सत्ता पक्ष के हर काम में आप सवाल उठेंगे यह हर कोई जानता है क्योंकि विपक्ष का यही काम है। लेकिन विदेशों में जाकर के भारत की बुराई करना या आपको शोभा नहीं देता’ अशी प्रतिक्रिया एका नेटकाऱ्याने व्यक्त केली. (Rahul Gandhi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.