मणिपूरमध्ये (Manipur) पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती बिकट झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरएएफला दंगल नियंत्रण वाहनांसह पाचारण करण्यात आले आहे. आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने पोलिसांना मागे हटण्यास भाग पडले. सातत्याने दगडफेक सुरू आहे. जमावाला पांगवण्यासाठी दुसऱ्या बाजूने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. (Manipur Violence)
(हेही पहा – Mumbai Dabbawala : मुंबईतील डब्बेवाल्यांचा धडा केरळच्या अभ्यासक्रमात)
आंदोलनात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 40 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे मणिपूर सरकारकडून राज्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तीन जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 12 सप्टेंबरपर्यंत मणिपूरमधील सर्व सरकारी आणि खासगी महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.
शाळा-महाविद्यालयेही रहाणार बंद
मणिपूरचे तीन जिल्हे इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिममध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. BNSS च्या कलम 163 (2) अंतर्गत थौबलमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. मणिपूरमधील सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालये 11 आणि 12 सप्टेंबर रोजी बंद रहातील, असे शिक्षण अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
मणिपूर सरकारच्या गृह विभागाने मंगळवार, १० सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून राज्यात ‘लीज लाईन्स, व्हीएसएटी, ब्रॉडबँड आणि व्हीपीएन सेवांसह इंटरनेट आणि मोबाईल डेटा सेवा तात्पुरती निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.
वर्षभर परिस्थिती अस्थिर
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मणिपूरमध्ये हिंसेचा तोच प्रकार पहायला मिळत आहे. गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही अशाच प्रकारे हिंसाचार झाला होता. ड्रोनद्वारे हवाई बॉम्बहल्ला करण्यापासून ते आरपीजी प्रक्षेपित करणे आणि आधुनिक शस्त्रांचा वापर यांमुळे परिस्थिती संवेदनशील बनली आहे. खोऱ्यातील हत्याकांडानंतर समन्वय समितीने ‘सार्वजनिक आणीबाणी’ जाहीर केली आहे. (Manipur Violence)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community