हिंदु राष्ट्र कायम ठेवायचे असेल, तर मोदींनी योगींकडे सत्ता सोपवावी; Sharad Ponkshe यांचे परखड प्रतिपादन

160
हिंदु राष्ट्र कायम ठेवायचे असेल, तर मोदींनी योगींकडे सत्ता सोपवावी; Sharad Ponkshe यांचे परखड प्रतिपादन
हिंदु राष्ट्र कायम ठेवायचे असेल, तर मोदींनी योगींकडे सत्ता सोपवावी; Sharad Ponkshe यांचे परखड प्रतिपादन

मुस्लिमांना त्यांच्या हक्काची अनेक राष्ट्रे आहेत. हिंदु धर्मासाठी मात्र भारत हा एकच देश आहे. येथून हाकलले, तर आसरा घ्यायला आपल्याला दुसरे राष्ट्र नाही. भारताला हिंदु राष्ट्र (Hindu Rashtra) कायम ठेवायचे असेल, तर 2027-2028 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) सत्तेतून पायउतार व्हावे आणि योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याकडे देशाची सत्ता सोपवावी. ‘सब का साथ, सब का विकास’ यामुळे आता मळमळायला लागले आहे, असे परखड मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात ‘भारत: काल, आज आणि उद्या’ या विषयावर ते बोलत होते.

(हेही वाचा – देशात पहिल्यांदाच 20 डब्यांची Vande Bharat train धावणार; मोदी दाखवणार हिरवा झेंडा)

सांगलीतील (Sangli) राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी शरद पोंक्षे यांनी हिंदु राष्ट्र आणि त्याचे भवितव्य या विषयावरही परखड मते मांडली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

हिंदु राष्ट्र संपवण्याची कुणाच्यात धमक नाही !

शरद पोंक्षे पुढे म्हणाले की, हजारो वर्षांपासून भारतावर अनेकांची आक्रमण झाली, पण कुणालाही हिंदु धर्म संपवता आला नाही. या खुळचट कल्पनेत कायम राहू नये. आज हिंदूंना संपवण्यासाठी जाती-जातींमध्ये विष पेरले जात आहे. आपण यापासून दूर राहून सनातनी संस्कृती टिकवायला हवी. ज्या क्षणी आपण 49 टक्क्यांवर आलो, त्या क्षणी आपला देश संपेल. घाबरू नका, हे काही शक्य नाही. निसर्गाने ज्याला बनवलंय, त्याला कुणी संपवू शकत नाही. हा निसर्गच निसर्गाला संपवेल, माणूस नाही. हजारो वर्षांपासून, चौथ्या-पाचव्या शतकापासून देशावर अनेक आक्रमणे झाली. हिंदु राष्ट्र (Hindu Rashtra) संपवण्याची कुणाच्यात धमक नाही. कुणालाही जमले नाही. ग्रीक, पोर्तुगीज, मोगल, ब्रिटीश, शक आणि तुर्क यांनीही आक्रमण करून त्यांचा देश बनवता आला नाही, कधी ते शक्यही होणार नाही; म्हणून या खुळचट कल्पनेत राहू नये. अखंड सावध असावे, असे समर्थ म्हणतात.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.