प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 10 नोव्हेंबर 2024 रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षे’चे (MAHATET) आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 आहे. (Maharashtra TET 2024)
शिक्षण सेवक/शिक्षक या पदांकरिता 10 नोव्हेंबर 2024 ला सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिक्षक पात्रता पेपर-1 घेण्यात येणार आहे, तर पात्रता पेपर-2 दुपारी 2 ते 4.30 दरम्यान होणार आहे. (Maharashtra TET 2024)
(हेही वाचा- Navi Mumbai Municipal Corporation पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी)
इ. 1 ली ते 5वी आणि इ. 6वी ते 8वी करिता सर्व व्यवस्थापने, परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित ईत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: MAHATET परीक्षा उत्तीर्ण होण अनिवार्य आहे. या परिक्षेकरिता 9 सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 30 सप्टेंबर अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे तर 28 ऑक्टोंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढता येणार आहे. (Maharashtra TET 2024)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-4 यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज, तसेच परीक्षेबद्दलची सविस्तर माहिती, परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (Maharashtra TET 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community