बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी तेथील अल्पसंख्य असलेल्या हिंदूंसाठी एक फतवा काढला आहे. येत्या श्री दुर्गापूजा उत्सवाच्या कालावधीत मशिदीत होणारी अजान आणि नमाज यांच्या ५ मिनिटे आधी श्री दुर्गापूजा विधी आणि ध्वनीक्षेपक प्रणाली बंद करावी, असे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत. हा आदेश तालिबानी असल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील हिंदूंनी दिली आहे. बांगलादेशी माध्यमांनी या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. (Hindus In Bangladesh)
(हेही वाचा – IAF Wing Commander वर बलात्काराचा आरोप; महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद)
गृह सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) महंमद जहांगीर आलम चौधरी यांनी मंगळवारी सचिवालयात बांगलादेश पूजा उद्यापन परिषदेच्या नेत्यांची भेट घेतली. या बैठकीनंतर महंमद जहांगीर आलम चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली.
या बैठकीनंतर गृह व्यवहार सल्लागारांनी बांगलादेशातील हिंदू समुदायाचा सर्वात मोठा धार्मिक सण असलेल्या दुर्गापूजेपूर्वी ‘कायदा आणि सुव्यवस्थेचा’ मुद्दा उपस्थित करण्यासाठी संक्षिप्त पत्रकार परिषद घेतली.
पत्रकार परिषद घेऊन केले जाहीर
पत्रकार परिषदेत आलम चौधरी म्हणाले की, बांगलादेशी हिंदू 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत दुर्गापूजा साजरी करतील. या पूजा समित्यांना अजान आणि नमाजपठण यांच्या पाच मिनिटे आधी पूजा, संगीतवाद्ये आणि ध्वनीक्षेपकबंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. मी सर्वांना विनंती केली आहे की, या वेळी सीमावर्ती भागात चांगले पूजा मंडप उभारावेत. जेणेकरून बांगलादेशातील नागरिकांना पूजा पाहण्यासाठी भारताच्या हद्दीत जावे लागणार नाही आणि दुसऱ्या बाजूच्या लोकांना (भारतियांना) येथे येण्याची गरज नाही”.
मूर्ती बनवण्याच्या वेळेपासून हिंदूंच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल. पूजा मंडपांमध्ये चोवीस तास सुरक्षा रहावी, यावर आम्ही चर्चा केली आहे, असा दावाही आलम यांनी केला आहे.
श्री दुर्गापूजा हा बांगलादेशी हिंदूंचा सर्वांत मोठा सण आहे. यावर्षी बांगलादेशात एकूण 32,666 पूजा मंडप उभारण्यात येणार आहेत. ढाका दक्षिण शहर आणि उत्तर महानगरपालिकेमध्ये अनुक्रमे 157 आणि 88 मंडप उभारण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी 33,431 पूजा मंडप उभारण्यात आले होते, असे आलम यांनी सांगितले. (Hindus In Bangladesh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community