नागपूरच्या अपघातानंतर मविआमध्ये धूसफुस ?; Sushma Andhare यांचे काँग्रेस आमदारावर आरोप

214
नागपूरच्या अपघातानंतर मविआमध्ये धूसफुस ?; Sushma Andhare यांचे काँग्रेस आमदारावर आरोप
नागपूरच्या अपघातानंतर मविआमध्ये धूसफुस ?; Sushma Andhare यांचे काँग्रेस आमदारावर आरोप

नागपूर येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीच्या अपघातानंतर महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप करू लागले आहेत. बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या गाडीने अनेक गाड्यांना ठोकर दिली. यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात बावनकुळेंच्या मुलाचे नाव नाही. ही गाडी संकेत बावनकुळे चालवत नव्हता, असे वक्तव्य काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केले आहे. यामुळे ‘काँग्रेसचे आमदार भाजपला मदत करत आहेत का’, अशी विचारणा सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. बावनकुळेंच्या मुलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी शिवसेना उबाठा गटाने केली होती.

(हेही वाचा – Hindus In Bangladesh : ‘अजानच्या पाच मिनिटे आधी पूजा आणि स्पीकर बंद करा; बांगलादेशच्या गृहमंत्रालयाचा फतवा)

गाडीत असलेले सर्व जण दारूच्या नशेत होते. पोलिसांनी गाडी आणि गाडी चालवणाऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र गुन्हा नोंद करत असताना त्यातून बावनकुळेंच्या मुलाचे नाव मात्र वगळले. यावर नागपूरचे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी संकेत बावनकुळे हा गाडी चालवत नव्हता. त्याच्या जागी दुसरे कोणी असते, तर सोडले नसते असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या की, विकास ठाकरे यांची काय मजबुरी आहे ? त्यामुळे ते संकेत बावनकुळेंना वाचवत आहेत. विकास ठाकरे यांच्याकडे जर पुरावे आहेत, तर ते अपघातानंतर 36 तास गप्प का होते ? स्थानिक राजकारणामुळे त्यांनी अशी भूमिका घेतली का ?

या प्रकरणी विकास ठाकरे यांनीही स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मी कुठलीही वेगळी भूमिका घेतलेली नाही. कोणी गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा व्हावी, हीच माझी भूमिका आहे. माझ्यावर चाळीस केसेस आहेत. भाजपशी कित्येक वर्षे लढतो आहे. बाहेरून येणाऱ्या कुणाही पेक्षा हा एकटा विकास ठाकरे भारी आहे’, असे विकास ठाकरे म्हणाले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.