Rahul vs Sarfraz : के एल राहुल की सर्फराझ खान? भारतीय संघात मधल्या फळीत कोण खेळणार?

Rahul vs Sarfraz : माजी कसोटीपटू कृष्णम्माचारी श्रीकांतने पाचव्या क्रमांकावर के एल राहुलला पसंती दिली आहे 

103
Rahul vs Sarfraz : के एल राहुल की सर्फराझ खान? भारतीय संघात मधल्या फळीत कोण खेळणार?
Rahul vs Sarfraz : के एल राहुल की सर्फराझ खान? भारतीय संघात मधल्या फळीत कोण खेळणार?
  • ऋजुता लुकतुके

भारताच्या कसोटी संघात मधल्या फळीतील एका जागेसाठी सध्या के एल राहुल आणि सर्फराझ खान (Rahul vs Sarfraz) यांच्यात चुरस आहे. दुलिप करंडकाच्या दुसऱ्या फेरीत सर्फराझ खान खेळणार आहे. त्यावरून सध्या के एल राहुलचं संघातील स्थान पक्कं समजलं जातंय. त्याचवेळी माजी कसोटीपटू श्रीकांतनेही राहुललाच पाचव्या स्थानावर पसंती दिली आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत के एल राहुल तंदुरुस्त नव्हता. म्हणूनच सर्फराझला भारतीय संघात जागा मिळाली. त्यानंतर चार कसोटींत त्याने २०० धावा केल्या. त्याची सरासरीही ५० च्या वर आहे.

(हेही वाचा- बारीक गोष्‍टींकडे देखील लक्ष द्या; Acidity पासून आराम आणि उत्तम झोप मिळण्‍यासाठी टिप्‍स)

आपल्या युट्यूब चॅनलवर भारतीय संघाच्या संभाव्य अकरा खेळाडूंबद्दल बोलताना श्रीकांत म्हणाले, ‘मला सर्फराझसाठी वाईट वाटतं. पण, क्रिकेटमध्ये असं होतं. तुम्ही चांगली कामगिरी करत असता. पण, ज्येष्ठ खेळाडू परततो, तेव्हा तुम्हाला त्याची जागा खाली करून द्यावी लागते.’ (Rahul vs Sarfraz)

श्रीकांतने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचाही उल्लेख केला. ‘निवड समितीचं लक्ष ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही असणार आहे. तिथं परदेशातील वातावरणात खेळण्याचा अनुभव के एल राहुलकडे सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे त्याला संधी मिळणं हेच योग्य आहे,’ असं श्रीकांत म्हणाले. दुलिप करंडकाच्या पहिल्या फेरीत दोन्ही डावांत राहुलने ३४ आणि ५७ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याचा फॉर्मही सध्या चांगला आहे. (Rahul vs Sarfraz)

(हेही वाचा- नागपूरच्या अपघातानंतर मविआमध्ये धूसफुस ?; Sushma Andhare यांचे काँग्रेस आमदारावर आरोप)

भारतीय संघातील पहिली चार स्थानं पक्की आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma), यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal), शुभमन गिल (Shubman Gill) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे पहिल्या चार क्रमांकावरील फलंदाज आहेत. पाचव्या स्थानासाठी मात्र के एल राहुल आणि सर्फऱाझ यांच्यात चुरस आहे. सर्फराझने दुलिप करंडकात ९ आणि ४६ धावा केल्या आहेत. बांगलादेश विरुद्धची पहिली कसोटी १९ सप्टेंबरपासून चेन्नईला होणार आहे. (Rahul vs Sarfraz)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.