कळसूबाई ट्रेक बद्दल माहिती
१६४६ मीटर म्हणजेच ५४०० फूट एवढी उंची असलेलं कळसूबाई हे महाराष्ट्रातलं सर्वांत उंच शिखर आहे. हे शिखर सर्वांत उंच असल्यामुळे या शिखरावरून आपल्याला अतिशय सुंदर दृश्य पाहायला मिळतं. महाराष्ट्रात कळसूबाई ट्रेक (kalsubai trek) खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे हा ट्रेक शक्य तितका सोपा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ज्या ठिकाणाहून चढणं अवघड आहे अशा ठिकाणी स्टीलचे रेलिंग, चेन, शिड्या बसवण्यात आल्या आहेत. कळसूबाई ट्रेक करताना तुम्हाला फक्त अप्रतिम निसर्गसौंदर्यच पाहायला मिळत नाही तर, कळसूबाई पर्वताच्या शिखरावर एक मंदिर देखील आहे. कळसूबाई पर्वताच्या शिखरावरून भंडारदरा तलाव आणि विल्सन धरणाचं सुंदर दृश्य पाहता येतं.
(हेही वाचा – नागपूरच्या अपघातानंतर मविआमध्ये धूसफुस ?; Sushma Andhare यांचे काँग्रेस आमदारावर आरोप)
ट्रेकिंग ग्रुपकडून साधारणपणे पुढे सांगितल्याप्रमाणे प्रवासाचा कार्यक्रम आखला जातो :
दिवस १ :
पहिल्या दिवशी तुम्हाला रात्री ११ वाजेपर्यंत कसारा स्टेशनला पोहोचणं गरजेचं आहे. वेळेवर कसारा येथे पोहोचण्याची जबाबदारी पूर्णपणे ट्रेकिंगला जाण्याऱ्या व्यक्तीची असते.
रात्री ११:०० वाजेपर्यंत कसारा स्टेशनवर पोहोचल्यावर तुम्हाला ट्रेकचे आयोजक किंवा सहप्रवासी भेटतील. कसारा स्टेशनवरून तुम्ही कळसूबाई ट्रेक (kalsubai trek) बेस व्हिलेजला जाण्यासाठी स्थानिक वाहतूकीच्या साधनांचा वापर करून जाऊ शकता.
(हेही वाचा – Hindus In Bangladesh : ‘अजानच्या पाच मिनिटे आधी पूजा आणि स्पीकर बंद करा; बांगलादेशच्या गृहमंत्रालयाचा फतवा)
दिवस २ :
दुसऱ्या दिवशी अंदाजे सकाळी ०५.०० वाजता तुम्ही कळसूबाई ट्रेक बेस गावामध्ये पोहोचू शकता. त्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊ शकता. बोनफायरचा आनंद घेऊ शकता.
मग चहा-नाश्ता करून फ्रेश झाल्यावर ट्रेकचे आयोजक तुम्हाला ट्रेकविषयी माहिती सांगतात आणि थोडक्यात परिचय करून देतात. माहिती आणि परिचय झाल्यानंतर कळसूबाई ट्रेकची (kalsubai trek) सुरुवात होते.
एकदा ट्रेकला सुरुवात केली तर दुपारच्या सुमारास तुम्ही कळसूबाई शिखरावर पोहोचू शकता. पर्वताच्या शिखरावर आराम करण्यासाठी थोडा वेळ मिळतो. तसंच तुम्ही थोडे स्नॅक्सही घेऊ शकता.
(हेही वाचा – prithvi theatre चा रोमांचक इतिहास जाणून घ्या!)
त्यानंतर मग दुपारी १:०० च्या सुमारास कळसूबाई शिखरावरून उतरण्यास सुरुवात करावी लागते. शिखरावरून खाली आल्यानंतर कळसूबाई ट्रेक बेस गावामध्ये गावरान जेवणाचा मनमुराद आस्वाद तुम्ही घेऊ शकता.
दुपारचं जेवण झाल्यानंतर सुमारे ५ वाजता शहराकडे परतण्यासाठी तुम्ही निघायला हवं. कळसूबाई ट्रेकच्या (kalsubai trek) सुंदर आठवणी घेऊन रात्री १० च्या सुमारास तुम्ही मुंबईला पोहोचू शकता.
(हेही वाचा – kangra airport : काय आहे कांग्रा विमानतळाचा इतिहास आणि वैशिष्ट्य?)
ट्रेक आयोजित करणाऱ्या ग्रुपकडून फीमध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टी
- कसारा ते कळसूबाई ट्रेक (kalsubai trek) बेस गाव येण्या-जाण्यासाठी सोय
- ट्रेक दरम्यान नाश्ता
- दुपारचं जेवण
- ट्रेक लीडर
- प्रथमोपचार पेटी इत्यादी.
(हेही वाचा – Duleep Trophy 2024 : सर्फराझ खान भारतीय संघात निवड होऊनही दुलिप करंडक का खेळतोय?)
ट्रेकला जाताना आवर्जून लागणाऱ्या गोष्टी
- ट्रेकिंग शूज अनिवार्य आहेत.
- किमान २ लिटरची पाण्याची बाटली असावी.
- कपड्यांची एक एक्स्ट्रा जोडी घ्यावी.
- तुमचं सर्व सामान भरण्यासाठी रकसॅक घ्यावी.
- वैयक्तिक औषधं (असल्यास).
- तुमचं ओळखपत्र
- ओले कपडे ठेवण्यासाठी एक्स्ट्रा पिशवी
महत्वाची टीप :
ट्रेकला जाताना कोणतीही मौल्यवान वस्तू जवळ बाळगू नका. जर बाळगणार असाल तर कृपया त्या वस्तूची काळजी स्वतः घ्या. आपली कोणतीही वस्तू गमावल्यास ट्रेकचे आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community