almora : अलमोडा हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे?

138
almora : अलमोडा हे शहर कशासाठी प्रसिद्ध आहे?

अलमोडा (almora) हे शहर भारतातल्या उत्तराखंडामधला कुमाऊं प्रदेशातला एक जिल्हा आहे. हे शहर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. जसे की,

नैसर्गिक सौंदर्य :

अलमोडा (almora) हे हिमालय पर्वताच्या विहंगम दृश्यांसाठी आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखलं जातं.

सांस्कृतिक वारसा :

अलमोडा हे आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखलं जातं. इथे उदय शंकर अकॅडमी ऑफ म्युझिक अँड डान्सही आहे.

हस्तशिल्प :

अलमोडा (almora) हे इथल्या स्थानिक आणि अद्वितीय हस्तकलेसाठी ओळखलं जातं.

(हेही वाचा – kangra airport : काय आहे कांग्रा विमानतळाचा इतिहास आणि वैशिष्ट्य?)

पाककृती :

अलमोडा (almora) हे बाल मिठाई आणि सिंगौरी यांसारख्या अनेक रुचकर पदार्थांसाठी ओळखलं जातं.

मंदिरे :

हे शहर इथल्या प्रमुख मंदिरांसाठी ओळखलं जातं. इथलं चिताई मंदिर हे विशेष प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त इथे कासार देवी, नंदा देवी, डोली दाना, श्यायी देवी, खाकमारा, अष्ट भैरव, जाखंडदेवी, कातरमाळ (सूर्य मंदिर), पाताळ देवी, रघुनाथ मंदिर, बद्रेश्वर, बनारी देवी, जगेश्वर, बिनसार महादेव, गढनाथ आणि बैजनाथ यांसारखी अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत.

लखुडियार :

अलमोडा (almora) इथे लखुडियारच्या गुहेमध्ये प्रागैतिहासिक रॉक पेंटिंग्ज आहेत. या पेंटिंग्ज अलमोडाच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकतात.

एकांत :

तुम्हाला जर शहरातल्या गर्दीचा कंटाळा आला असेल तर शांत एकांत मिळवण्यासाठी आणि गर्दीतून बाहेर पडण्यासाठी अलमोडा हे एक उत्तम ठिकाण आहे.

(हेही वाचा – kalsubai trek ला कसे जाल आणि कशी काळजी घ्याल?)

अलमोडा विषयी आणखी जाणून घेऊयात

अलमोडा (almora) हे भारतातल्या उत्तराखंडातील कुमाऊं प्रदेशाच्या राजधानीचं शहर आहे. अलमोडा हे शहर मनमोहक निसर्गसौंदर्य, हिमालय पर्वताचं विहंगम दृश्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेलं, अप्रतिम हस्तकला आणि रुचकर स्थानिक फूड डिशेससाठी प्रसिद्ध आहे. तसंच इथल्या मार्केट्समध्ये तुम्ही भरपूर शॉपिंगही करू शकता.

अलमोडा (almora) हे शहर समुद्र सपाटीपासून १,६३८ मीटर एवढ्या उंचीवर काशाया नावाच्या टेकडीवर ५ किलोमीटरच्या प्रदेशात पसरलेलं आहे. हे हिलस्टेशन घोड्याच्या नाळेच्या आकाराच्या एका कड्यावर वसलेलं आहे. या हिलस्टेशनच्या पूर्वेकडच्या भागाला तालिफत आणि पश्चिमेकडच्या भागाला सेलिफत असं म्हणतात. अलमोडाचं नयनरम्य निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी शेकडोंच्या संख्येने पर्यटक इथे येतात. अलमोडा हे कुमाऊं प्रदेशातल्या अनेक व्यावसायिक प्रदेशांपैकी एक आहे. या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनीही वास्तव्य केलं होतं.

(हेही वाचा – Duleep Trophy 2024 : सर्फराझ खान भारतीय संघात निवड होऊनही दुलिप करंडक का खेळतोय?)

अलमोडा येथे कसं पोहोचता येतं?

इथे रस्त्याने प्रवास करून जायचं बसेल तर दिल्ली, चंदीगड, लखनऊ आणि देहराडून या शहरांतून उत्तराखंड राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करून पोहोचता येतं. याव्यतिरिक्त तुम्ही खाजगी वाहनाने किंवा वाहन भाड्याने घेऊनही प्रवास करू शकता.

रेल्वेने प्रवास करून जायचं असेल तर काठगोदाम रेल्वे स्टेशन हे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे. काठगोदाम हे स्टेशन ईशान्य रेल्वेच्या ब्रॉडगेज लाइनचं शेवटचं टर्मिनस आहे. हे रेल्वे स्टेशन कुमाऊंला दिल्ली, देहराडून आणि हावडासोबत जोडतं.

याव्यतिरिक्त फ्लाईटने इथे येणार असाल तर पंतनगर हे इथे असलेलं संपूर्ण कुमाऊं जिल्ह्याला जोडणारं एक प्राथमिक एअरपोर्ट आहे. तसंच बरेली एअरपोर्ट हे आणखी एक डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. इथून निघणाऱ्या फ्लाईट्स कुमाऊं इथेही जातात. याव्यतिरिक्त दिल्लीमध्ये असलेलं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे इथलं सर्वात जवळचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.