आज मुंबई महानगर पालिकेत नगरसेवकांची सर्व शस्त्र यांनी काढून घेतली आहेत. नगरसेवक आयुक्तांना साधा प्रश्नही विचारू शकत नसल्याचे म्हणत मग आयुक्तांना काय झक मारायला पगार देता, असा घणाघात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी हिंदुस्थान पोस्टच्या मुलाखतीत केला. कोविड भ्रष्टाचार असो, वा शिवसेनेचे हिंदुत्व या सर्व मुद्द्यांवर संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
तो राडा की बाचाबाची?
शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये काही दिवसांपूर्वी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना भवन इथे जो वाद झाला त्याबाबत संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याआधी आम्ही शिवसेनेचे राडे हे लहानपणापासून बघत आलो आहोत. आम्हीही अनेकदा मनसे स्टाईल आदोलनं केली आहेत. त्यामुळे त्यादिवशी भाजप आणि शिवसेनेत झालेला तो राडा नव्हता, ती केवळ बाचाबाची होती, असे संदीप देशपांडे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर टीका
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातील त्यांच्या कामगिरीबद्दलही संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. गेल्या दीड वर्षात राज्यात कामच झाले नाही. त्यामुळे काम झाले ते चांगले की, वाईट याचं मूल्यमापन करणं अशक्य आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना दिलासा देण्यासाठी काही केले नाही. कोविड परिस्थिती हाताळण्यातही राज्य सरकार अपयशी झाले आहे. 10वी, 12वीच्या परीक्षांचाही राज्य सरकारने गोंधळ करुन ठेवलेला आहे. आरक्षण देण्यातही सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला केवळ महापालिका कंत्राटदारांचा वर्ग हाच काय तो या सरकारच्या कामामुळे समाधानी आहे, असा आरोपही संदीप देशपांडे यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community