- ऋजुता लुकतुके
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान दरम्यानची कसोटी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नॉयडा इथं आयोजित करण्यात आली होती. पण, मागचे तीन दिवस मुसळधार पावसामुळे इथं एकही चेंडू टाकला जाऊ शकलेला नाही. शिवाय सामन्याची नाणेफेकही झालेली नाही. ग्रेटर नॉयडा हे काही भारतातील नियमित कसोटी केंद्र नाही. आंतरराष्ट्रीय नाही तर देशांतर्गत सामनेही इथं होत नाहीत. अशावेळी आंतरराष्ट्रीय कसोटी इथं का आयोजित करण्यात आली असा प्रश्न विचारला जात आहे. (Afg vs NZ)
ग्रेटर नॉयडातील हे मैदान बीसीसीआयच्या (BCCI) अखत्यारीत येत नाही. ग्रेटर नॉयडा औद्योगिक विकास मंडळाकडे त्याची जबाबदारी आहे. तिथे नियमितपणे क्रिकेट सामने होत नसल्यामुळे मैदानावर साचलेलं पाणी काढून टाकण्यासाठी इथं सुपरसॉपरची सोय नाही. तसंच मैदान झाकण्यासाठी पुरेशी कव्हर्सही नाहीत. इतकंच नाही तर मैदानात पुरेसा कर्मचारी वर्गही नाही.
(हेही वाचा – Rahul Gandhi यांचा देशात पुन्हा वादंग माजवण्याचा कट; अमेरिकेत इल्हान उमरची घेतली भेट)
Day 2 Abandoned! 😕
Day 2 of the one-off #AFGvNZ Test has officially been called off. Despite multiple efforts to dry the surface, the outfield remained unfit for play.#AfghanAtalan | #AFGvNZ | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/IB1GpKOZhw
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) September 10, 2024
आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असलेली ही मालिका अशा मैदानावर खेळली जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कसोटीचे पहिले तीनही दिवस पावसात वाहून गेले आहेत. त्यामुळे सामनाधिकारी जवागल श्रीनाथ या कसोटीवर काय शेरा मारतात याकडे आता लक्ष लागले आहे. हे मैदान अफगाणिस्तानचं घरचं मैदान आहे. देशात अस्थिरतेमुळे क्रिकेट शक्य नसताना अफगाण संघ नॉयडातच सराव करतो.
पण, आंतरराष्ट्रीय सामना इथं का भरवला जातोय याविषयी अजूनही स्पष्टता नाही. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, त्यांनी अफगाण क्रिकेट संघाला तीन मैदानांचे पर्याय दिले होते. पैकी अफगाण संघाने या मैदानाची निवड केली. (Afg vs NZ)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community