लेस्टर (इंग्लंड) येथे 2022 मध्ये हिंदूंविरोधी दंगल भडकवणारा माजिद फ्रीमनला 22 आठवडे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर दहशतवाद आणि दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला आहे. नॉर्थहॅम्प्टन दंडाधिकारी न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश अमर मेहता यांनी सोमवार, 9 सप्टेंबर रोजी त्याला कलम ४ अंतर्गत शिक्षा सुनावली. माजिद फ्रीमन (Majid Freeman) याने वर्ष 2022 मध्ये लिसेस्टर येथे झालेल्या हिंदूविरोधी दंगलीत हिंदूंविषयी खोटी आणि चुकीची माहिती पसरवली होती. तसेच हिंदूंची मंदिरे, घरे लक्ष्य करून हिंदूंवर आक्रमण केले होते.
लेस्टर येथील समस्यांना वाचा फोडणाऱ्या इनसाइट यू.के. (INSIGHT UK) या संघटनेने ‘एक्स’वर याची माहिती दिली आहे. वर्ष २०२२ मधील लिसेस्टर येथील दंगलीच्या वेळी हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करणारा आणि हिंदूंच्या विरोधात हिंसाचाराला चिथावणी देणारा माजिद फ्रीमन याला २२ आठवडे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
(हेही वाचा Rahul Gandhi यांचा देशात पुन्हा वादंग माजवण्याचा कट; अमेरिकेत इल्हान उमरची घेतली भेट)
28 ऑगस्ट 2022 रोजी टी-20 क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. त्यानंतर माजिद फ्रीमन याने भारतीय ध्वजाचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला साहाय्य केले होते. या वेळी हिंदू तणाव शांत करण्याचा प्रयत्न करत असतांनाही फ्रीमन (Majid Freeman) याने भारतीय ध्वजाचा अवमान करण्यास चिथावणी देणे चालू ठेवले होते. त्याने कुराण जाळल्याची अफवाही पसरवली होती. त्यानंतर दंगल उसळली होती.
माजिद फ्रीमन याचा इस्लामी आतंकवादाला पाठिंबा
माजिद फ्रीमन (Majid Freeman) गाझावरील इस्रायलच्या कारवाईला विरोध करत आहे. त्याने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या आतंकवादी आक्रमणाला पाठिंबा दिला होता. सामाजिक माध्यमांवरही त्याने हमास आणि पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता.
Join Our WhatsApp Community