Mahavitaran Abhay Yojana 2024 : थकीत वीजबिल ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय’ योजना

159
Mahavitaran Abhay Yojana 2024 : थकीत वीजबिल ग्राहकांसाठी महावितरणची ‘अभय’ योजना

वीजबिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरणने ‘अभय’ योजना २०२४ (Mahavitaran Abhay Yojana 2024) सुरू केली आहे. ग्राहकांना वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १७८८ कोटी रुपये माफ केले जाणार आहेत. १ सप्टेंबरपासून योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

(हेही वाचा – IAF Wing Commander वर बलात्काराचा आरोप; महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद)

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेचा मालक, खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावे. (Mahavitaran Abhay Yojana 2024)

(हेही वाचा – Shimala येथे बेकायदा मशिदीच्या विरोधात शेकडो हिंदू उतरले रस्त्यावर)

राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकीत बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ आहे. ३८ लाख ग्राहकांकडून महावितरणला मूळ बिलाची ५०४८ कोटी रुपयांची रक्कम, तसेच १७१९ कोटी रुपये व्याज आणि ६९ कोटी ९० लाख रुपये विलंब आकार येणे आहे. या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येईल. (Mahavitaran Abhay Yojana 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.