I.N.D.I. आघाडीची फोड करून सांगताना Rahul Gandhi यांनी स्वतःची लाज काढली!

235
I.N.D.I. आघाडीची फोड करून सांगताना Rahul Gandhi यांनी स्वतःची लाज काढली!
  • खास प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या ‘एनडीए’विरोधात (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) काँग्रेसने ४० विरोधी पक्षांचा एक गट तयार तयार करून त्याला ‘भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी’ म्हणजेच इंग्रजीमध्ये The Indian National Developmental Inclusive Alliance (I.N.D.I.A) असे नाव दिले. मात्र, काँग्रेसकडून आघाडीचा उल्लेख ‘इंडिया’ आघाडी असा केला जातो. याच आघाडीच्या नावातील शेवटच्या ‘A’ ची फोड करून सांगताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुरती पंचाईत झाली आणि त्यांनी अमेरिकेत स्वतःची, काँग्रेस पक्षाची आणि देशाची लाज काढली.

गांधींची बोबडी वळली

राहुल गांधी आता केवळ एका पक्षाचे नेते नाहीत तर देशाच्या सांविधानिक, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते पदी आहेत. सध्या गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून विविध ठिकाणी मुलाखती देत भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत फिरत आहेत. एका मुलाखतीत त्यांना ‘इंडिया’ची फोड (full form) विचारली असता गांधींची बोबडी वळली.

(हेही वाचा – Rahul Gandhi यांचा देशात पुन्हा वादंग माजवण्याचा कट; अमेरिकेत इल्हान उमरची घेतली भेट)

मुलाखतकारानेही हसू आवरले

मुलाखतकाराने इंग्रजीतील म्हणजेच I. N. D. I. A. alliance ला ‘इंडी’ आघाडी असे योग्यप्रकारे संबोधले. त्यावर गांधी म्हणाले की, ‘माफ करा, ही ‘इंडी’ आघाडी नाही तर ‘इंडिया’ आघाडी आहे.” तिथेही गांधी यांनी भाजपावर टीका करण्याची संधी सोडली नाही. ते पुढे म्हणाले, ‘‘इंडी आघाडी ही भाजपाची रचना आहे.” असे गांधी यांनी सांगितले. त्यावर मुलाखतकाराने I.N.D.I.A. मधील शेवटच्या ‘A’ या आद्याक्षराचा फूल फॉर्म विचारला असता काही क्षण गांधी बुचकळ्यात पडले. विचार करून त्यांनी alliance (आघाडी) असे स्पष्ट केले. “मग Alliance (आघाडी) वेगळे बोलणे हे अनावश्यक नाही का?” असे मुलाखतकार तात्काळ म्हणाला आणि कसेबसे हसू आवरले.

वास्तविक I.N.D.I.A. म्हटल्यानंतर Alliance हे वेगळे म्हणण्याची गरज नाही, त्यामुळे I.N.D.I. Alliance किंवा इंडी आघाडी हा योग्य शब्द आहे, हे गांधी आणि त्यांच्या आघाडीला अजूनही मान्य नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

(हेही वाचा – Rahul Gandhi आरक्षण मुद्द्यावर संभ्रमात; नेटकऱ्यांनी घेरले)

‘आउट ऑफ सीलॅबस सवाल’

ही व्हिडिओ क्लिप भारतात प्रचंड व्हायरल झाली आणि गमतीचा विषय झाला. नेटकऱ्यांनीदेखील राहुल गांधी यांची टिंगल केली. “ये है तुम्हारा पप्पू खान.. आउट ऑफ सीलॅबस सवाल आ गया..” अशी खिल्ली उडवली. एकाने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली की, “तरीही काही मूर्ख अजून त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरवत असून रात्रं-दिवस त्याची जाहिरात करत आहेत.”

‘शहाणपणाला मर्यादा, मूर्खपणाला नाही’

एका महिलेने म्हटले की, “मला विशास बसत नाही. ही एक अशी व्यक्ती आहे की, जी दुसऱ्याच्या दारात जाते आणि माझे घर आणि माझे लोक किती वाईट आहेत, असे सांगते.” एकाने तर, “शहाणपणाला मर्यादा, आहेत पण मूर्खपणाला नाही,” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया पोस्ट केली. “इंडिया मे कॉमेडी शो कम पड गये थे, जो ये विदेश मे कॉमेडी शो करने चला गया” असे एकाने म्हटले तर काहीनी गांधी यांना ‘जोकर’ असे संबोधले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.