प्रभू श्रीरामांच्या खानदानाची लायकी काढणाऱ्यांना Sharad Pawar यांचा पाठिंबा?

383
Congress-NCP चा पर्दाफाश; तोंडी पुरोगामी भाषा, पण पूजाअर्चा करा आणि उमेदवारी भरताना गुरुपुष्यामृताचा मुहूर्त गाठा!!
  • खास प्रतिनिधी

एकेकाळचे ‘चित्रलेखा’ या सप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी नुकतेच संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात भाषण ठोकले आणि हिंदू धर्म, राम-सीता, अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य केले. ‘प्रभू श्रीराम यांच्या खानदानाची लायकी काय?’ इथपर्यंत त्यांची जीभ सुटली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज व्यासपीठावर उपस्थित होते मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही की निषेध नोंदवला नाही. त्यामुळे पवार आणि शाहू महाराज यांची या सगळ्याला संमती होती आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे बोलले गेले नाही असे रोखठोक मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना व्यक्त केले. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

(हेही वाचा – Cement Concrete Road : रस्त्याचा दर्जा, गुणवत्ता राखण्यासाठी आयआयटीची नियुक्ती)

महारावांच्या शब्दांत

श्रीरामावर अश्लील टीका करणारे वक्तव्य जसेच्या तसे ज्ञानेश महाराव (Dnyanesh Maharao) म्हणाले, रामाचे मंदिर बांधलं, कशासाठी बांधलं? कधीतरी विचार करा ना तुम्ही, तो एक पत्नी होता, आमुक होता, तमुक होता, काय होता. त्याच्यावर नाटक आलेली ती पहा तुम्ही, त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातनं बाहेर काढलं, तर मी तो कोण तीचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय, धोब्याचं ऐकतो, बायकोचं बाळंतपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो, तीचं बाळंतपण होत आणि आपण त्याला देव मानतो, आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे, त्या मामा वरेरकरांचं नाटक आहे त्याचे फक्त पाच शो झाले, पाच शो ‘भुमीकन्या सीता’ नावाचे, ती जी सीता ऑल्यानंतर राम तिथे उभा आहे, लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे, ती त्या रामाला विचारते, तु स्वतःला इतका मोठा समजतो. राजा समजतो, देव समजतो अजुन कोण काय समजतो? तुझ्याबरोबर तुझा भाऊ आला तुझी बायको आली, एक वर्ष ती अशोक वनामध्ये होती, म्हणून तिच्यावरती तु संशय घेतलास, तु तुझ्या भावाला विचारलस काय? की १४ वर्षे तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल, ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको, माझी शुद्धता बघ, म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल.’

(हेही वाचा – Nair Hospital च्या अधिष्ठात्यांना सक्त ताकीद देण्याचे ‘या’ समितीचे प्रशासनाला निर्देश)

.. म्हणून दखल घ्यावी लागली

याबाबत डॉ. निरगुडकर यांनी म्हटले की, तसे हे भाषण दखल घेण्याजोगं नव्हतं पण पवार आणि शाहू छत्रपती यांच्या समोर महारावांनी हे भाषण केले त्यामुळे दखल घ्यावी लागली. महाराव यांनी स्वामी समर्थ यांच्यावरही टीका केली तेव्हा उपस्थित महिला आणि पुरुष मंडळींमध्ये काही आनंद व्यक्त झाला नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. (Sharad Pawar)

ब्रिगेडचे लेबल काढून बोला..मग कळेल..

“भटांची राख करा’ असं एक वाक्य महाराव यांनी वापरले. आजचे राजकीय वातावरण लक्षात घेता हा त्यांचा रोख कुणावर (भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) आहे हे उघड आहे. हेच सगळे विचार त्यांनी संभाजी ब्रिगेडचे लेबल काढून महाराष्ट्रभर फिरून मांडावे, मग किती लोक येतात ते बघू,” अशा शब्दांत निरगुडकर यांनी महारावांना आव्हान दिले. (Sharad Pawar)

(हेही वाचा – Rahul Gandhi आरक्षण मुद्द्यावर संभ्रमात; नेटकऱ्यांनी घेरले)

छत्रपतीही गप्प?

“महाराव यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या प्रवृत्तीला साजेसे आहे, त्याला मूक संमती देणे हे सभेचे प्रमुख होते त्यांनी मान्य करण्यासारखे आहे, पण मला आश्चर्य वाटते ते शाहू छत्रपतींचे. माझ्या माहितीप्रमाणे, कोल्हापुरात त्यांचे एक पुरातन राम मंदिर आहे, त्यात राम-सीतेची मुर्ती आहे. त्या मूर्तीची यथासांग पूजा केली जाते. असं असताना प्रभू श्री रामाबद्दल आक्षेपार्ह असे आक्षेप नोंदवल्यानंतर गप्प राहणे, याला काय म्हणावे,” असा प्रश्न निरगुडकर यांनी उपस्थित केला. सभेचे औचित्य साधून ते कदाचित तेव्हा गप्प बसले असतील पण नंतर माध्यमांशी ते बोलू शकले असते, याकडे निरगुडकर यांनी लक्ष वेधले. (Sharad Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.