Coastal Road : दक्षिणेकडे जोडणाऱ्या पुलाची मार्गिका येत्या शुक्रवारी १३ सप्टेंबर पासून होणार खुली 

94
Coastal Road : दक्षिणेकडे जोडणाऱ्या पुलाची मार्गिका येत्या शुक्रवारी १३ सप्टेंबर पासून होणार खुली 
Coastal Road : दक्षिणेकडे जोडणाऱ्या पुलाची मार्गिका येत्या शुक्रवारी १३ सप्टेंबर पासून होणार खुली 
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अंतर्गत उत्तर वाहिनी मार्गिका (चौपाटी ते वरळी) आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू यांना दक्षिणेकडे जोडणाऱ्या पुलाची  मार्गिका  १३ सप्टेंबर २०२४ पासून सकाळी ७ ते रात्री ११ दरम्यान नागरिकांना वाहतुकीस खुली करून देण्यात येणार आहे. (Coastal Road)
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अंतर्गत उत्तर वाहिनी मार्गिका (चौपाटी ते वरळी) आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू यांना दक्षिणेकडे जोडणाऱ्या पुलाची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे गुरूवार दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता करणार आहेत. त्यानंतर ही मार्गिका  १३ सप्टेंबर २०२४ पासून सकाळी ७ ते रात्री ११ दरम्यान नागरिकांना वाहतुकीस खुली करून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आयोजित या पाहणी प्रसंगी  उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांचीही प्रमुख उपस्थितीत असणार आहे. (Coastal Road)
या प्रसंगी मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar),  मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्यासह विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. (Coastal Road)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.