Ganeshotsav 2024 : पंतप्रधान मोदींनी घेतले सरन्यायाधिशांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन

162
Ganeshotsav 2024 : पंतप्रधान मोदींनी घेतले सरन्यायाधिशांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन
Ganeshotsav 2024 : पंतप्रधान मोदींनी घेतले सरन्यायाधिशांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन

राज्यासह देशभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) यांच्या दिल्लीतील घरीही गणपती आणि ज्येष्ठागौरींचे पूजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही सरन्यायाधिशांच्या घरी गणपतीपूजनामध्ये सहभाग घेतला. पारंपरिक महाराष्ट्रीय पोशाख करून त्यांनी गणपती आणि गौरींची आरती केली.

(हेही वाचा – प्रभू श्रीरामांच्या खानदानाची लायकी काढणाऱ्यांना Sharad Pawar यांचा पाठिंबा?)

या वेळी सरन्यायाधिशांनी कुटुंबासह त्यांचे स्वागत केले.

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. हा 10 दिवसांचा उत्सव अनंत चतुर्दशीला संपतो. या वेळी 7 सप्टेंबर या दिवशी गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवार, १० सप्टेंबर या दिवशी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. तेथेही पंतप्रधानांनी गणपतीपूजेत सहभाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांनाही श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.