-
ऋजुता लुकतुके
मोटोरोला कंपनीने भारतातील नवीन फोल्डेबल फोन लाँच केला आहे. ४९,९९९ रुपयांचा हा फोन या बाजारपेठेतील सगळ्यात किफायतशीर मोबाईल फोन असेल. मोटो रेझर ५० असं या नवीन फोनचं नाव आहे. ६.९ इंचांच्या मोठ्या डिस्प्ले बरोबरच ५० मेगापिक्सेलचा सेन्सर या फोनला आहे. सध्या या फोनवर कंपनीने सवलत देऊ केलीय. फोनची मूळ किंमत ६४,९९९ रुपये इतकी आहे. पण, या फोनवर ५,००० रुपयांची सूट आहे. तर विविध बँक कार्डांवर १०,००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. त्यामुळे एकूण १५,००० रुपयांच्या सवलतीसह फोनची किंमत ४९,९९९ रुपये इतकी होते. (Moto Razr 50)
(हेही वाचा- उत्तम शिक्षणासाठी Madarsa चुकीचे ठिकाण; बाल हक्क आयोगाची सर्वोच्च न्यायालयासमोर स्पष्टोक्ती)
ग्राहकांना सुरुवातीला जेमिनी या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲपचं सबस्क्रिप्शन तसंच २ टीबीचं स्टोरेज मिळणार आहे. फोनचा डिस्प्ले ६.९ इंच इतका विशाल आहे. एलटीपीओ एचडी डिस्प्ले सह १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि ३,००० नीट्सची प्रखरता आहे. फोन दुमडलेला असेल तेव्हा डिस्प्ले ३.६ इंचांचा असेल. भगवा, वाळूचा रंग तसंच करडा अशा तीन रंगांत हा फोन उपलब्ध आहे. (Moto Razr 50)
Motorola Razr 50 Launched In India 🇮🇳
6.9″ FHD+ 120Hz LTPO OLED Main Display
3.6″ FHD+ pOLED 90Hz Cover Display
7th Gen Gorilla Glass
50MP (OIS) + 13MP UW
32MP Front
Dimensity 7300X
LPDDR4x
UFS 2.2
4,200mAh battery
30W Charging
15W Wireless
Side Fingerprint Scanner
Dual Speakers pic.twitter.com/SlX3VDeejw— Sufiyan Technology (@RealSufiyanKhan) September 9, 2024
मोटो रेझर ५० फोनमध्ये मीडियाटेक डिमेन्सिटी ७३०० हा अत्याधुनिक प्रोसेसर आहे. फोनची प्रणाली अँड्रॉईड १४ आहे. फोनची बॅटरी ४,२०० एमएचए क्षमतेची आहे. ३३ वॅटचा टर्बो पॉवर फास्ट चार्जर या फोनबरोबर देण्यात आला आहे. मोटोरेझर ५० फोनचा प्राथमिक कॅमेरा हा ५० मेगापिक्सेलचा आहे. तर अल्ट्रावाईड लेन्स १३ मेगापिक्सेलची आहे. सेल्फी तसंच व्हीडिओ कॉलसाठी ३२ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. फोनला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तर पाण्यापासून हा फोन पूर्णपणे सुरक्षित आहे. (Moto Razr 50)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community