-
ऋजुता लुकतुके
मॉरिस गराज कंपनीने अखेर भारतात आपल्या विंडसर गाडीचं इलेक्ट्रिक मॉडेल लाँच केलं आहे. विंडसर ईव्हीची किंमत ही ९.९९ लाख रुपये इतकी आहे. पण, यात एक मेख आहे. गाडीची बॅटरी ग्राहकांना कंपनीकडून प्रती किलोमीटरमागे साडेतीन रुपये या दराने लीजवर मिळणार आहे. गाडी भारतात लाँच झाली असली आणि तिच्याविषयीची सर्व माहिती कंपनीने उघड केली असली तरी बुकिंग हे ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तर टेस्ट ड्राईव्ह १३ ऑक्टोबरला सुरू होईल. ही गाडी कॉम्पॅक्ट युटिलिटी व्हेहिकल अर्थात, सीयुव्ही प्रकारातील आहे. एक्साईट, एक्सक्लुजिव्ह तसंच इसेन्स या तीन प्रकारात ती ग्राहकांना उपलब्ध होईल. (MG Windsor EV)
(हेही वाचा- Coastal Road : दक्षिणेकडे जोडणाऱ्या पुलाची मार्गिका येत्या शुक्रवारी १३ सप्टेंबर पासून होणार खुली )
विंडसर ईव्ही गाडीची विक्री सुरुवातीला चीनमध्ये सुरू झाली. वुलिंग क्लाऊड या नावाने तिथे ती विकली जात होती. क्लाऊड ईव्हीज कंपनीच्या डिझाईनवर आधारित हे डिझाईन होतं. भारतातही तेच डिझाईन असेल. गाडीचे दिवे मागून पुढून एलईडी आहेत. एलईडी दिव्यांच्या छोट्या माळेमुळे या गाडीला स्पोर्टी लुक प्राप्त झाला आहे. गाडीचं काचेचं छत हे खूपच मोठं म्हणजे एकावेळी ४ ते ५ जण उभे राहू शकतील असं आहे. (MG Windsor EV)
The Windsor EV is here!
Priced at an introductory Rs 9.99 lakh, MG is offering a rather interesting ownership programme, allowing you to rent the Windsor EV’s battery at Rs 3.5 per kilometre! Here’s all you need to know about it —➡️ Single PMSM
➡️ 136hp & 200Nm
➡️ 38kWh li-ion… pic.twitter.com/3gkae6B5ZV— PowerDrift (@PowerDrift) September 11, 2024
गाडीतील चालकाजवळचा डिस्प्ले ८.८ इंचांचा आहे. तर मागची सिट १३५ अंशांपर्यंत खाली जाऊ शकते. त्यामुळे ही गाडी खूपच आरामदायी आहे. चालक आणि सहप्रवाशाच्या सिट इलेक्ट्रिक पद्धतीने सरकवल्या जाऊ शकतात. एसी व्हेंटही गरजेनुसार एका बटनावर आपली वाऱ्याची दिशा बदलू शकतात. अँड्रॉईड आणि ॲपल कार प्लेसाठी वायरलेस जोडणी होऊ शकते. इन्फिनिटी साऊंड सिस्टिममध्ये ८ स्पीकर आहेत. वायरलेस फोन चार्जिंगची सोय तर गाडीत आहेच. (MG Windsor EV)
(हेही वाचा- उत्तम शिक्षणासाठी Madarsa चुकीचे ठिकाण; बाल हक्क आयोगाची सर्वोच्च न्यायालयासमोर स्पष्टोक्ती)
गाडीतील बॅटरी ३८ केडब्ल्यूएच क्षमतेची आहे. या बॅटरी इंजिनातून १३४ बीएचपी इतकी शक्ती निर्माण होऊ शकते. बॅटरी पूर्णपणे चार्ज केलेली असले तर ही गाडी ३३१ किमीचं अंतरही एका दमात कापू शकते. गाडी चालवताना तुम्हाला इको, इको प्लस, स्पोर्ट्स आणि नियमित असे चार मोड उपलब्ध आहेत. बॅटरी चार्ज करण्यासाठी मॉरिस गराज कंपनीने ग्राहकांना तीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. प्राथमिक ३.३ केव्ही क्षमतेचा चार्जर १३.७ तासांत अख्खी बॅटरी चार्ज करतो. तर ७.४ आणि ५० केव्ही क्षमतेचा चार्जर अनुक्रमे ६.५ तास आणि ५५ मिनिटांत बॅटरी चार्ज करून देतो. (MG Windsor EV)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community