-
ऋजुता लुकतुके
ॲपल कंपनीने यंदा जगभरात त्यांच्या फोनच्या किमती कायम ठेवल्या आहेत. पण, १६ सीरिज भारतात लाँच करताना मात्र त्यांनी किंमती इतर देशांच्या तुलनेत थोड्या कमी ठेवल्या आहेत. ग्लोटाईम या जागतिक कार्यक्रमात ॲपलने आपला आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्स हे दोन फोन लाँच केले. आधीच्या फोनच्या तुलनेत या फोनचा डिस्प्ले मोठा आहे. तर फोनमध्ये एआय हे अद्ययावत टूल आहे. तसंच आधीच्या फोनच्या तुलनेत कॅमेराही वरचढ आहे. (Apple iPhone 16 Series Launched)
(हेही वाचा- Ganeshotsav 2024 : पंतप्रधान मोदींनी घेतले सरन्यायाधिशांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन)
भारतात १२८ जीबी स्टोरेज असलेला आयफोन प्रो हा फोन १,१९,९९० रुपयांना मिळणार आहे. तर आयफोन १६ प्रो मॅक्स हा फोन १,४४,९९० रुपयांना मिळेल. गेल्यावर्षी आयफोनची १५ सीरिज ही १,३४,९९० रुपयांपासून सुरू झाली होती. त्या तुलनेनं आताची किंमत नक्कीच कमी आहे. आयफोन १६ आणि आयफोन १६ प्लस ही प्राथमिक मॉडेल अनुक्रमे ७९,९९० रुपये आणि ८९,९९० रुपयांना मिळतील. (Apple iPhone 16 Series Launched)
आयफोनमध्ये झालेला सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे डिस्प्लेचा बदललेला आकार. प्रो फोनचा डिस्प्ले ६.२ इंचांचा तर प्रो मॅक्स फोनचा डिस्प्ले ६.९ इंचाचा आहे. आधीच्या फोनच्या तुलनेत ॲपलचे कॅमेराही चांगलेच सुधारले आहेत. प्रो सीरिजमधील फोनचे कॅमेरे ५ एक्स टेलिफोटो लेन्सचे आहेत. प्राथिमिक कॅमेरा ४८ मेगापिक्सेलचा आहे. अल्ट्रावाईड कॅमेराही ४८ मेगापिक्सेलचा असेल. (Apple iPhone 16 Series Launched)
Apple launches the new iPhone 16 series, powered by Apple AI, starting at Rs 79,900.#Techinformer #iPhone16 #iPhone16Pro #iPhone16ProMax #iPhone16Plus #Apple #iPhone pic.twitter.com/LWPuv7ZQjF
— Tech Informer (@Tech_Informer_) September 9, 2024
नवीन आयफोनमध्ये कॅमेरासाठी एक खास वेगळं बटनही देण्यात येणार आहे. या वर्षाच्या शेवटी आयफोनमधये हे बटन द्यायला सुरुवात होईल. आयफोन १६ सीरिजपासून कंपनीने एआय प्रणालीचा जोरदार वापर सुरू केला आहे. सिरी तुम्हाला देत असलेला प्रतिसाद आता आधीपेक्षा कमी वेळेत आणि आणखी अचूक असेल. तसंच चॅटजीपीटीचा वापरही आयफोनमध्ये तुम्ही करू शकणार आहात. कंपनी संदेश पाठवणे, ईमेल पाठवणे, प्रूफ रिडिंग या कामांसाठीही एआयची सेवा सुरू करणार आहे. पण, आयओएस १८ प्रणालीमध्ये ही सेवा उपलब्ध होईल. एका छोट्या अपडेट नंतर ही सेवा आताच्या ग्राहकांनाही मिळू शकेल. (Apple iPhone 16 Series Launched)
(हेही वाचा- Pension : मुंबई महापालिकेच्या ८० वर्षांवरील सेवा निवृत कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, निवृत्ती वेतनात होणार वाढ)
जगाच्या तुलनेत यावेळी पहिल्यांदाच कंपनीने भारतातील फोनच्या किमती कमी ठेवल्या आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठ कंपनीला किती महत्त्वाची आहे, हेच यातून अधोरेखित होतं. सध्या या फोनचं प्रीबुकिंग सुरू आहे. आयफोन बरोबरच कंपनीने ॲपल वॉच सीरिज १० आणि एअरपॉड्स ४ लाँच केले आहेत. (Apple iPhone 16 Series Launched)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community