-
ऋजुता लुकतुके
मुकेश आणि नीता अंबानींची सगळ्यात धाकटी सून राधिका मर्चंट देखील उद्योजक घराण्यातून येते. तिचे वडील विरेन मर्चंट आणि आई शैलजा मर्चंट हे एनकोअर हेल्थकेअर ही कंपनी चालवतात. तिला एक मोठी बहीण आहे अंजली मर्चंट. राधिका आणि अनंत यांच्या लग्नाचा सोहळा अक्षरश: काही महिने सुरू होता. फक्त भारतातीलच नव्हे तर जागतिक सेलिब्रेटींनी या सोहळ्याला हजेरी लावली. राधिकाचे वडील विरेन मर्चंट हे एनकोअर हेल्थकेअर कंपनीचे प्रमुख आहेत. तर आई शैला मर्चंट एनकोअरसह काही कंपन्यांच्या संचालक मंडळात आहे. (Viren Merchant Net Worth )
(हेही वाचा- Pension : मुंबई महापालिकेच्या ८० वर्षांवरील सेवा निवृत कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, निवृत्ती वेतनात होणार वाढ)
राधिकाची मोठी बहीण अंजलीही सुरुवातीपासून एनकोअरमध्ये विविध विभागांत कार्यरत आहे. व्यवसाय विकास विभागात महाव्यवस्थापक पदावर तिने कामाला सुरुवात केली. तिथून आपल्या कामाचा ठसा उमटवत ती संचालक मंडळात पोहोचली आहे. कंपनीची एक सक्रिय संचालक आहे. विरेन मर्चंट हे एनकोअर हेल्थकेअरमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर आहेत. त्यांची एकूण मालमत्ता ही ७५० कोटी रुपयांच्या घरात आहे. शिवाय विरेन हे घरातील पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत. त्यांनी एनकोअर हेल्थकेअर स्वत: सुरू केली आहे. (Viren Merchant Net Worth )
Meet #AnantAmbani’s future in-laws — #VirenMerchant and #ShailaMerchant — who have a net worth of over Rs 750 Crore and run a leading pharma company: https://t.co/UUwg2Vj8jc pic.twitter.com/L2gMzK5tKc
— GQ India (@gqindia) April 26, 2024
आरोग्यसेवा व्यवसायात नवनवीन पद्धती आणि रणनीती आखण्याचं श्रेय विरेन मर्चंट यांना दिलं जातं. त्यांच्याच नेतृत्वाखाली कंपनीने जागतिक स्तरावर विस्तार केला आहे. त्यामुळे विरेन यांचं औद्योगिक नेतृत्वही भारतात चर्चेचा विषय झाला आहे. औषधांबरोबरच आरोग्यसेवेलाही कंपनीने महत्त्व दिलं आहे. औषधं, कॉस्मेटिक्स आणि न्युट्रासिटिकल्स उत्पादनांमध्ये कंपनीने आपलं नाव तयार केलं आहे. कंपनीच्या या विसताराचं नेतृत्व विरेन यांनी केलं आहे. (Viren Merchant Net Worth )
(हेही वाचा- MG Windsor EV : एमजी विंडसरची इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारपेठेत लाँच; जाणून घ्या किंमत)
राधिका मर्चंटची आई शैला मर्चंट या एनकोअर बरोबरच इतरही काही कंपन्यांच्या संचालक मंडळात आहेत. हॅवेल्स, स्वस्तिक एक्झिम, अथर्वा इम्पेक्स या काही कंपन्या उदाहरणादाखल देता येतील. एनकोअरमध्येही धोरणात्मक निर्णय घेण्यात त्यांचा पुढाकार असतो. त्यांची एकूण संपत्ती ही १० कोटी रुपये इतकी आहे. विरेन आणि शैला यांनी २००२ मध्ये एनकोअर कंपनीची स्थापना केली होती. सुरुवातीला हेल्थकेअर उद्योगासाठी ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या कंपनीचा हेतू होता. आरोग्यसेवा पुरवणारे, आरोग्यसेवेची गरज असलेले व्याधीग्रस्त लोक आणि आरोग्य सेवेच्या ग्राहकांना तसंच पुरवठादारांना एकत्र जोडणारं हे देशातील एक सगळ्यात मोठं व्यासपीठ मानलं जातं. (Viren Merchant Net Worth )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community