-
ऋजुता लुकतुके
गुगलची मुख्य कंपनी असलेल्या अल्फाबेट या कंपनीचं नेतृत्व गेली काही वर्ष एका भारतीयाकडे आहे. सुंदर पिचाई असं या कॉर्पोरेट नेत्याचं नाव आहे. मागची अनेक वर्षं सर्वाधिक पगार असलेला भारतीय म्हणून तो गाजतोय. अलीकडे मात्र एका मोठ्या आयटी कंपनीचा प्रमुख असलेला हा तंत्रज्ज काहीसा अडचणीत आहे. या पदावरून काही महिन्यातच त्यांना पायउतार व्हावं लागेल अशी चर्चा जागतिक स्तरावर सुरू आहे. (Sundar Pichai Salary)
पण, अल्फाबेट सारख्या एकेकाळी अव्वल स्थानावर असलेल्या कंपनीचा सीईओ भारतीय असावा ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद आहे. प्रत्येकच टेक कंपनी सध्या एआयवर काम करतेय. अल्पाबेटच्या जेमिनी या एआय टूलने कंपनीला धोका दिला. तिथेच सुंदर पिचाई यांना या फजितीची जबाबदारी घेऊन पदावरून दूर व्हावं लागेल, अशी चिन्हं आहेत. (Sundar Pichai Salary)
(हेही वाचा- Pension : मुंबई महापालिकेच्या ८० वर्षांवरील सेवा निवृत कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, निवृत्ती वेतनात होणार वाढ)
आयआयटीमधून अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर सुंदरराजन पिचाई भारतातून अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी आले. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांचा वर्षाचा अख्खा पगार सुंदरराजन यांच्या विमान खर्चावर खर्च केल्याचं पिचाई यांनीच एका मुलाखतीत अलीकडे सांगितलं होतं. पण, वडिलांचे हे कष्टाचे पैसे सुंदर यांनी नक्कीच सत्कारणी लावले. अमेरिकेत आपलं नशीब आजमावताना अल्फाबेट कंपनीत ते स्थिरस्थावर झाले. डिसेंबर २०१९ मध्ये लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुंदर यांच्याकडे कंपनीचं मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद सोपवण्यात आलं. (Sundar Pichai Salary)
सुंदर पिचाई यांचा सीईओ म्हणून पगार हा वार्षिक २० लाख अमेरिकन डॉलर इतका आहे. पण, लाभांश आणि बोनसच्या तसंच कंपनीच्या शेअरच्या स्वरुपात त्यांना याहून कितीतरी जास्त मोबदला मिळतो. २०२२ मध्ये त्यांनी तब्बल २२६ दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी रक्कम मोबदला म्हणून कंपनीकडून मिळवली होती. (Sundar Pichai Salar)
(हेही वाचा- Ganeshotsav 2024 : पंतप्रधान मोदींनी घेतले सरन्यायाधिशांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन)
गुगलच्या गुगल मॅप्स, जीमेल, पिक्सेल आणि अँड्रॉईड या उत्पादनांसाठी सुंदर पिचाई यांना श्रेय दिलं जातं. मोठ्या पदांवर काम करताना सुंदर पिचाई यांच्या वैयक्तिक संपत्तीतही वाढ झाली आहे. आणि २०२४ मध्ये त्यांची एकूण मालमत्ता १.३ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्याकडे कंपनीचे २४ लाख समभाग आहेत. २००४ मध्ये सुंदर यांनी गुगल कंपनीत प्रवेश केला होता.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community