विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून महायुती तसेच महाविकास आघाडी दोन्हीकडे कुरबुर सुरू आहे. त्यातच महायुतीचा एक भाग असलेले महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचा राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभेला २८८ जागा लढवण्याच्या विचारात असून तशी तयारी देखील त्यांनी सुरू केली आहे. (Vidhanasabha Election 2024)
किती दिवस एखाद्याच्या आश्रयाखाली राहायचं ?
महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) आपली नाराजी बोलून दाखवताना म्हटले की, “रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही. आपण किती दिवस एखाद्याच्या आश्रयाखाली राहायचं? त्यापेक्षा आपली आपली तयारी केली पाहिजे.” जानकर पुढे म्हणाले की आम्ही महायुतीमध्ये आहोत की नाही हेच माहिती नसल्याने प्रत्येकाने आपली तयारी केली पाहिजे. पुढे ते म्हणाले की राष्ट्रीय समाज पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागा लढवणार आहे. (Vidhanasabha Election 2024)
लोकसभेवेळी देखील दाखवली होती नाराजी…
लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) हे नाराज होते. परभणीतून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षासोबत त्यांची बोलणीही झाली असल्याचे सांगितले जाते. मात्र महायुतीने त्यांची समजूत काढली आणि त्यांना परभणीतूनच उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाली खरी मात्र जानकरांना या मतदारसंघातून विजय मिळवता आला नाही. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महादेव जानकरांनी नाराजीचे अस्त्र पुन्हा एकदा उपसले आहे. (Vidhanasabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community