Champions Trophy 2025 : आयसीसीची पाकिस्तानबरोबर चॅम्पियन्स करंडकावर चर्चा 

Champions Trophy 2025 : भारत पाकमध्ये खेळणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे 

62
Champions Trophy 2025 : आयसीसीची पाकिस्तानबरोबर चॅम्पियन्स करंडकावर चर्चा 
Champions Trophy 2025 : आयसीसीची पाकिस्तानबरोबर चॅम्पियन्स करंडकावर चर्चा 
  • ऋजुता लुकतुके

आयसीसीची चॅम्पियन्स एकदिवसीय करंडक स्पर्धा पुढील वर्षी पाकिस्तानात होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकची तयारी आजमावण्यासाठी आयसीसीचं एक पथक पाकिस्तानचा दौरा करणार आहे. याच महिन्यात हा दौरा होईल. त्या दरम्यान पाकिस्तान मंडळाने आखलेलं स्पर्धेचं वेळापत्रकही चर्चिलं जाईल. वेळापत्रक हाच या दौऱ्याचा कळीचा मुद्दा असणार आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Virat Kohli : सचिनचा ‘हा’ विक्रम मोडण्यासाठी विराटला हव्या आणखी ५८ धावा)

कारण, पाकिस्तानने यापूर्वी आयसीसीला संभाव्य वेळापत्रक सादर केलं आहे. आयसीसीने सहभागी देशांच्या मंडळांना हे वेळापत्रक आधीच दाखवलं आहे. त्यांच्याकडून त्याविषयीची मतं घेतली आहेत. पाकने या वेळापत्रकात भारतासाठी लाहोर हे केंद्र निवडलं आहे. भारताचे सर्व सामने तिथेच भरवण्याची तयारी सुरक्षेच्या कारणास्तव दाखवली आहे. त्यामुळे .या बाबतीत नेमकी काय चर्चा होते, हे आता बघावं लागेल. (Champions Trophy 2025)

भारताचा संघ चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानला जाण्यासाठी तयार आहे का, हा मुख्य प्रश्न आहे. आतापर्यंत तरी बीसीसीआयने केंद्रसरकारकडे चेंडू ढकलला आहे. कारण, पाकिस्तानला जाण्यासाठी भारतीय नागरिकाला केंद्रसरकार आणि गृह मंत्रालयाची परवानगी लागते, असं बीसीसीआयचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आशिया चषकाप्रमाणे स्पर्धेचं स्वरुप हाय-ब्रीज करावं असा आणखी एक पर्याय आहे. यात भारताचे सामने हे पाकिस्तान बाहेर खेळवले जातील. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- MLA disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा लांबणीवर; आता २१ ऑक्टोबरला सुनावणी)

पण, सध्या तरी पाकिस्तानची या गोष्टीला मान्यता नाही. त्यामुळे स्पर्धेचं वेळापत्रकच अजून ठरलेलं नाही. (Champions Trophy 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.