-
ऋजुता लुकतुके
केंद्रसरकारने आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होती. आता ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही याचा लाभ मिळू शकेल. योजनेसाठी असलेली उत्पन्नाची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांना नसेल. योजनेचा विस्तार वाढल्यानंतर ४.५ कोटी अतिरिक्त जनतेला या योजनेचा नव्याने फायदा मिळू शकेल. निवृत्तीसाठीची आर्थिक सोय करण्यात भारतीय मागे आहेत. तब्बल ७३ टक्के भारतीय निवृत्तीसाठीची तरतूद करत नसल्याचं एका आकडेवारीतून समोर आलं आहे. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. (Ayushman Bharat)
या योजनेअंतर्गत विमाधारकाला ५ लाख रुपयांचा कौंटुबिक आरोग्य विमा मिळतो. सुरुवातीला केंद्रसरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही विमा योजना सुरू केली होती. देशाच्या ४० टक्के जनतेला याचा फायदा मिळत होता. आता या सेवेत आणखी ४.६ कोटी कुटुंबांचा समावेश होईल. ७० वर्षाच्या प्रत्येक नागरिकाला आता नवीन आरोग्य कार्ड दिलं जाईल. आणि या सेवेचा लाभ कसा मिळवायचा याची माहितीही दिली जाईल. (Ayushman Bharat)
(हेही वाचा- MLA disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा लांबणीवर; आता २१ ऑक्टोबरला सुनावणी)
या योजनेत एका कुटुंबाला ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा लागू होतो. जर एका कुटुंबात एकापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक असतील तर विम्याची रक्कम त्यांच्यामध्ये विभागली जाईल. ज्या ज्येष्ठ नागरिकांना इतर कुठल्याही सरकारी विमा योजनेचा लाभ मिळत असेल तर त्यांना आयुष्मान भारत कार्ड घेतानाच एक विमा योजना निवडावी लागेल. (Ayushman Bharat)
योजनेच्या विस्तारासाठी सरकारला ३,४३७ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. यात केंद्रसरकार ६० टक्के तर राज्यसरकार ४० टक्के खर्चाचा वाटा उचलणार आहे. दुर्गम भागांमध्ये ९० टक्के वाटा केंद्रसरकार उचलेल. (Ayushman Bharat)
(हेही वाचा- Vidhanasabha Election 2024 : महायुती मध्ये आणखी एक मित्र पक्ष नाराज ?)
देशातील ७० वर्षाचे सर्व नागरिक आता आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेसाठी पात्र असतील. ज्यांना सीजीएचएस, एसजीएचएस किंवा आयुष्मान योजनेच्या सीएपीएफ या योजनेअंतर्गत विमा लाभ मिळत असेल त्यांनी यातून एका पर्यायची निवड करायची आहे. म्हणजेच आयुष्माम भारत योजनेचा लाभ घेतला तर त्यांना इतर लाभ सोडावे लागतील. पण, त्याचवेळी खाजगी विमा घेतला असेल तर आयुष्मान योजनेचा लाभ त्यांना मिळू शकेल. आयुष्मान योजनेचे पूर्वीचे लाभार्थी असाल तर आता तुम्हाला अतिरिक्त ५ लाखांचा आरोग्य विमा मिळू शकेल. (Ayushman Bharat)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community