शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देशाच्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर अविश्वास दाखवत शिवसेना उबाठा आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. त्याचा संबंध थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी चंद्रचूड यांच्या घरी गणपतीची आरती केली, याच्याशी जोडत ‘संविधान के घर को आग लगी, घर के चिरागसे..’ अशी एक पोस्ट ‘X’ या समाजमाध्यमावर टाकली आणि लोकांनी त्यांनाच ट्रोल केले. एकाने तर राऊत यांचा मोदी-स्तुति करतानाच एक जुना व्हिडिओ शेयर केला.
खटल्यांपासून स्वतःला वेगळे करावे
मोदी यांनी चंद्रचूड यांच्या घरी गणारायच्या दर्शनासाठी भेट दिली. यावरून मोदी आणि चंद्रचूड यांचे जवळचे संबंध आहेत, अशी शंका राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली आणि चंद्रचूड यांनी शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खटल्यांपासून स्वतःला वेगळे करावे, असे मत मांडले.
(हेही वाचा – राहुल गांधींचा आरक्षणविरोधी चेहरा उघड; अमेरिकेतील वक्तव्याचा Devendra Fadnavis यांनी घेतला समाचार)
तारीख पे तारीख
तसेच ‘संविधान के घर को आग लगी, घर के चिरागसे..’ अशी एक पोस्ट ‘X’ या समाजमाध्यमावर टाकली. त्यात त्यांनी म्हटले की, “संविधान के घर को आग लगी घरके चिरागसे…. १) EVM को क्लीन चीट २) महाराष्ट्र में चलरही संविधान विरोधी सरकार के सुनवाई पर ३ सालसे तारीख पे तारीख ३) प. बंगाल बलात्कर मामले मे sue moto हस्तक्षेप लेकीन महाराष्ट्र रेप कांड का जिकर नहीं. ४) दिल्ली मुख्यमंत्री केजरीवाल के bail पर तारीख पे तारीख. ये सब क्युं हो रहा है? क्रॉनॉलॉजी समज लिजीये… भारत माता की जय!!!!”
हिंदुस्तान की शान है मोदी
या पोस्ट वर एकाने, “अरे मिस्टर नॉटी, आधि सांग हा वीडियो तुमच्या हिंदुत्वासारखा खोटा आहे का? ‘आँधी नहीं, तूफ़ान हैं मोदी, हिंदुस्तान की शान है मोदी,’ इटालियन मातोश्रीच्या छत्रछायेत तू गणपति बाप्पा मोरया करायला विसरला?” असे सांगून राऊत यांचा मोदी यांच्यावर स्तुतिसुमानांचा वर्षाव करतानाचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला.
(हेही वाचा – Ayushman Bharat : आयुष्यमान भारत योजनेच्या विस्तारामुळे सरकारवर साडेतीन हजार कोटींचा भार)
बालासाहब होते तो नंगा घुमाते
“संजय कीड़े मारने की दवा पी जा.. अब बालासाहब होते तो आज मुंबई सड़क पे नंगा करके घुमाते,” असे एका नेटकाऱ्याने राऊत यांना डिवचले तर एकाने “हिंदूहदयसम्राट श्रीमान बालासाहेब ठाकरे के कपूत्र को कलमा पढ़ाने वाला अब क्रोनोलोजी पढ़ाएगा,” अशा शब्दांत राऊत (Sanjay Raut) यांच्या पोस्टला उत्तर दिले.
जमानत मिली तो मीलॉर्ड सही
एकाने राऊत यांना प्रश्न केला की, “क्या मुख्य न्यायधीश से PM का मिलना अपराध है? जब केजरीयल को जमानत मिली थी , मनीष को जमानत मिली तब मीलॉर्ड सही थे? अब गलत हो गए??” तर एकाने, “अब शिवसेना गणेश पूजा का भी विरोध करने लगी!” हे लक्षात आणून दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community