‘उबाठा’च्या अजान स्पर्धेनंतर भायखळ्यात आता शिवसेनेच्या आमदाराकडून Burqa वाटप

154
‘उबाठा’च्या अजान स्पर्धेनंतर भायखळ्यात आता शिवसेनेच्या आमदाराकडून Burqa वाटप
‘उबाठा’च्या अजान स्पर्धेनंतर भायखळ्यात आता शिवसेनेच्या आमदाराकडून Burqa वाटप

काही वर्षांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजान प्रतियोगिता आयोजित केली होती. ज्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती विरोधकांनी जोरदार टीका केली होती. आता त्याच दक्षिण मुंबई येथील मोहम्मद अली रोड येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांच्याकडून थेट मुस्लिम महिलांना बुरखा (Burqa) वाटपाचा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला होता.

(हेही वाचा – Microsoft India : मायक्रोसॉफ्ट कंपनीची पुण्यात ५२० कोटींची नवीन गुंतवणूक)

विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यातच आता सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. त्यातच आता मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्याकडील शिवसेना आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांच्या पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावरुन आता विरोधकांनी टीका केली आहे.

मागील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वात जास्त मुस्लिम आणि दलित मतांचा फटका हा शिंदे यांची शिवसेना आणि भाजपाला बसला होता. त्यामुळेच आता मुस्लिम मतांना आपल्या बाजूला करून घेण्यासाठी थेट पक्षाच्या बॅनरखाली बुरखा (Burqa) वाटपाचा कार्यक्रम घेऊन मुस्लिम महिलांना आपल्या बाजूला ओढण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.