Vidhanasabha Election 2024 : विदर्भातील ठाकरे गटाच्या एकमेव आमदाराविरोधात महायुतीत कोणाला उमेदवारी मिळणार?

116
Vidhanasabha Election 2024 : विदर्भातील ठाकरे गटाच्या एकमेव आमदाराविरोधात महायुतीत कोणाला उमेदवारी मिळणार?
Vidhanasabha Election 2024 : विदर्भातील ठाकरे गटाच्या एकमेव आमदाराविरोधात महायुतीत कोणाला उमेदवारी मिळणार?

शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर गुवाहाटीला गेलेले आणि नंतर परत आलेले ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) राज्याच्या राजकारणात अचानक चर्चेत आले होते. मात्र त्यांच्याच बाळापूर मतदारसंघावरून आता महायुतीत चढाओढ सुरु आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh) कुणीही आपल्याविरोधात असलं तरी फरक पडणार नसल्याचं म्हटलं आहे. (Vidhanasabha Election 2024)

(हेही वाचा – Sanjay Raut यांनी दाखवला सरन्यायाधीशांवर अविश्वास आणि झाले ट्रोल..)

बाळापूर विधानसभा मतदारसंघ विदर्भातील ठाकरे गटाचा आमदार असलेला एकमेव मतदारसंघ आहे. २०२१ मधील राज्यातील ऐतिहासक सत्तानाट्यात हा मतदारसंघ आणि येथील आमदार देशभरात चर्चेत आले. याचं कारण ठरलं की सत्तानाट्यात शिंदे गटात गेलेले आमदार नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh) गुवाहाटीतून परत येत उद्धव ठाकरेंची साथ देणं पसंद केलं होतं. (Vidhanasabha Election 2024)

मतदारसंघावरून महायुतीतील तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरु आहे. महाविकास आघाडीतून ही जागा ठाकरे गटाला मिळणार आणि नितीन देशमुख (Nitin Deshmukh) उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.