Dnyanesh Maharao यांना अटक करण्याच्या मागणीसाठी पनवेलमध्ये हिंदू उतरले रस्त्यावर

वाशी येथे २२ ऑगस्टला झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ज्ञानेश महाराव (Dnyanesh Maharao) यांनी हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, उर्मिलामाता तसेच श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अवमानकारक आक्षेपार्ह वक्तव्य केले.

315

तथाकथित पुरोगामी पत्रकार ज्ञानेश महाराव (Dnyanesh Maharao) यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात अश्लाघ्य टीका केली होती, त्यामुळे गुरुवार, 12 सप्टेंबर रोजी पनवेलमध्ये ज्ञानेश महाराव यांचा हिंदू संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच पोलिसांनी महाराव यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली.

या निषेध आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शिवसेनेचे पनवेल शहर जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, युवा नेते प्रथमेश सोमण, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, रमेश मुंडे, हिंदवी सेनेचे पनवेल शाखेचे संस्थापक निलेश पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, बजरंग दलाचे गुरुनाथ मुंबईकर, विश्व हिंदू परिषदेचे अमोल साखरे, माजी नगरसेवक विकास घरत, संजय भगत, के.सी. पाटील, पनवेल शहर सरचिटणीस अमित ओझे, उपाध्यक्ष केदार भगत, विनायक मुंबईकर, रुपेश नागवेकर, चिन्मय समेळ, देवांशु प्रभाळे, आकाश भाटी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा प्रभू श्रीरामांच्या खानदानाची लायकी काढणाऱ्यांना Sharad Pawar यांचा पाठिंबा?)

वाशी येथे २२ ऑगस्टला झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ज्ञानेश महाराव (Dnyanesh Maharao) यांनी हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, उर्मिलामाता तसेच श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अवमानकारक आक्षेपार्ह वक्तव्य केले व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या होत्या. विशेषतः या कार्यक्रमाला खासदार शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. या मंडळींच्या समोरच महाराव (Dnyanesh Maharao) यांनी टीका केली आणि ही टीका या उपस्थित मंडळींनी सहनही केली, त्यामुळे सर्व स्तरातून याचाही निषेध करण्यात आला. गुरुवारी पनवेलमधील हिंदू संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यासमोर हिंदू संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. राजकारण करत असताना धर्माच्या विषयात हस्तक्षेप करू नये नाही तर परिणाम उग्र होतील, अशा शब्दात संतप्त कार्यकर्त्यांनी इशारा दिला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.