लोकसभा निवडणुकीत शिवसेना उबाठाला (Shiv Sena UBT) मुस्लिम मतांनी तारले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत (शप) गेल्यामुळे हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेला आपणही कसे तथाकथित धर्मनिरपेक्ष आहोत, हे दाखवण्याचा ध्यास लागला आहे. ‘एमआयएम’शी (MIM) युती केली तर हिंदू मते आणखी दूर होतील. यासाठी ‘एमआयएम’चा (MIM) उमेदवारच उबाठा गटात घ्यायचा, असा विचार करून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांनाच उबाठा गटात येण्याची ऑफर दिल्याचे समजते. यासंदर्भात जलील यांची उबाठाच्या एका ज्येष्ठ नेत्याशी चर्चा सुरू असल्याचे समजते. त्यामुळे इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) हे शिवसेना उबाठाच्या (Shiv Sena UBT) चिन्हावर विधानसभा निवडणुकीला उभे राहिले तर आश्चर्य वाटायला नको, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
उबाठा मुस्लिमांच्या विरोधात नाही
बीड येथे माध्यमांशी बोलताना उबाठा नेते अंबादास दानवे यांनी सांगितले की, शिवसेना उबाठाने हिंदुत्व सोडले नाही. तसेच उबाठा येत्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार उभे करू शकतो कारण शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) मुस्लिमांच्या विरोधात नाही. त्याचवेळी दानवे यांनी उबाठा एमआयएमशी (MIM) कधीही युती करणार नाही, असेही स्पष्ट केले.
(हेही वाचा – Gautam Gambhir : ना रोहित, ना धोनी, गंभीर ‘या’ भारतीय खेळाडूला म्हणतो शेहनशाह)
मुंबईतील हॉटेलमध्ये चर्चा
दरम्यान, एमआयएमचे (MIM) नेते इम्तियाज जलील (Imtiyaz Jalil) यांनी महाविकास आघाडीला युतीसाठी प्रस्ताव दिल्याचे पत्रकारांना सांगितले. त्याचवेळी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांचा एक छोटा नेता अशी खिल्ली उडवत उबाठाच्या मोठ्या नेत्याशी आपण तासन्तास चर्चा केल्याचे सांगितले. “दानवे यांच्यापेक्षा वरिष्ठ नेत्याशी मुंबईतील हॉटेलमध्ये माझी काही तास चर्चा झाली असून त्यांची इच्छा होती की ही प्राथमिक चर्चा असून ती उघड करू नये,” असे जलील म्हणाले.
निवडून आणण्याची जबाबदारीही घ्या
उबाठा मुस्लिम उमेदवार उभा करू शकतो या दानवे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की नुसते उमेदवारी देऊन जबाबदारी झटकू नका तर त्याला निवडून आणण्याची जबाबदारीही उबाठाने घ्यायला हवी. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जलील यांना उबाठा गटात घेण्यासाठी प्राथमिक बोलणी झाली असून एमआयएमशी युती करण्यापेक्षा मशाल चिन्हावरच जलील यांना लढण्याची ऑफर देण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community