पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतींचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्या हस्ते गणपतीची आरती देखील करण्यात आली. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मात्र, विरोधकांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थान इफ्तार पार्टी ठेवायचे आणि सरन्यायाधीश तेथे जात होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला गेल्यामुळे इतका गहजब का? असा प्रतिप्रश्न फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपस्थित केला आहे.
देशभर में गणेशोत्सव की धूम है। चारों तरफ आस्था और पूरे भक्तिभाव से भगवान गणेश जी का पूजन किया जा रहा है। कल तो गौरी-गणपति का महालक्ष्मी पूजन भी हुआ।
इसी दौरान भारत के मा. मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड जी के घर कल मा. प्रधानमंत्री जी ने भगवान गणेश जी की आरती और माता महालक्ष्मी जी… pic.twitter.com/pdkdVTz6z1— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 12, 2024
हिंदुत्वला विरोध करता करता गणपती आणि महालक्ष्मीला देखील विरोध करण्यापर्यंत यांची मजल कशी गेली, असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी केला. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. इतकेच नाही तर हा विरोधकांकडून भक्ती आणि श्रद्धेचा अपमान होत असल्याचा आरोप देखील फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे.
(हेही वाचा राहुल गांधींचा आरक्षणविरोधी चेहरा उघड; अमेरिकेतील वक्तव्याचा Devendra Fadnavis यांनी घेतला समाचार)
राऊत यांनी केली होती टीका
सरन्यायाधीश पदावर चंद्रचूड यांसारखी व्यक्ती असताना 3 वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवले जाते. घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जाते, हे सरकार घटनाबाह्य आहे, असे सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी निर्णय आणि निकाल होत नाही. आता ते निवृत्तीला आले असता त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्यामुळे यामागे सरकार वाचवण्यासाठी वेगळे काही घडतेय का?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.
गणेशोत्सवाची देशभरात सर्वत्र धूम आहे. आस्थेने गणरायाचे पूजन केले जात आहे. काल तर गौरी-गणपतीतील महालक्ष्मीपूजन सुद्धा होते. देशाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्याकडे बुधवारी पंतप्रधानांनी गणरायाची आरती केली आणि महालक्ष्मी पूजन सुद्धा केले. सरन्यायाधीश महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीत खास महाराष्ट्रीयन व्यक्तीकडूनच ते दरवर्षी गणरायाची मूर्ती पूजेसाठी आणतात. पण अचानक इकोसिस्टीम अशी कार्यान्वित झाली की, जणू आभाळ कोसळले. फरक फक्त इतकाच आहे की, आधीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित रहायचे. पण, गणपती आणि महालक्ष्मी पूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले तर इतका गहजब का?
Join Our WhatsApp Community